पिंपरी चिंचवड, दि.०७:-भोसरी येथील किराणा दुकानात पैसे मागणा-या व ‘पैसे नाही दिले तर हात पाय तोडेन’ अशी धमकी देणाऱ्या तृतीयपंथी इसमावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडेवस्ती, भोसरी येथील जयमाता दी किराणा दुकानात शुक्रवारी (दि.06) सायंकाळी पाच वाजता हा प्रकार घडला.याप्रकरणी दुकानाच्या महिला मालक यांनी शुक्रवारी (दि.06) भोसरी एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तृतीयपंथी इसमावर भारतीय दंड विधान कलम 385, 504 अंतर्गत खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व त्यांची मुलगी त्यांच्या किराणा दुकानात थांबले होते. यावेळी त्याठिकाणी आलेल्या आरोपी तृतीयपंथी इसमाने दोन हजार रुपयांची मागणी केली.फिर्यादी महिलेनं पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी तृतीयपंथी इसमाने ‘पैसे नाही दिले तर हात पाय तोडेन’ अशी धमकी दिली. तसेच, मुलीला शिवीगाळ करून दुकानासमोर आरडाओरडा केला असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास भोसरी एम आय डी सी पोलीस. पोउनि.चव्हाण करत आहेत.