युनायटेड हॉस्पिटलयटी असोसिएशन मानले सरकारचे आभार
पुणे, दि.०८ :-हॉटेल सुरू व्हावी म्हणून युनायटेड हॉस्पिटलयटी असोसिएशनच्या वतीने पुण्यातील विविध ठिकाणी सरकारच्या विरोधात घंटानाद व थाळीनाद आंदोलन नुकतेच करण्यात होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. शहरात रात्री १० वाजेपर्यंत हॉटेल उघडण्यासाठी परवानगी मिळाली मिळाली मात्र ग्रामीण भागात हॉटेलला १० वाजेपर्यंत परवानगी न मिळाल्याने ग्रामीण भागात ही हॉटेल सुरू करण्यात यावी अशी मागणी युनायटेड हॉस्पिटॅलिटी असोसिएशन कडून करण्यात येत आहे.एफटीएपीच्या समन्वय लवली नारंग यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यात कोविडची प्रकरणे बरीच कमी झाल्यामुळे आम्ही हॉटेल सुरू व्हावी म्हणून सरकारकडे पाठपुरावा करत होतो. आमच्या धरणे आणि निषेध आणि घंटानादानंतर अखेर सरकार जागे झाले आणि आमच्या मागण्या मान्य केल्या. आमच्या समस्या समजून घेण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित दादा पवार यांचे आभार मानतो.कोषाध्यक्ष समीर शेट्टी म्हणाले की, आम्ही आमच्या सर्व समिती सदस्यांचे आभार मानतो ज्यांनी निषेधाच्या वेळी आमच्यासोबत उभे राहून आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढा दिला. त्यांचा पाठिंबा हा लढाचा सर्वात महत्वाचा भाग होता. मी आमच्या सदस्यांना विनंती करतो की त्यांचे व्यवसाय चालवताना सर्व कोविड प्रोटोकॉलचे पालन करा.यूएचएचे प्रवक्ते महुआ नारायण म्हणाल्या की, कोविडची संख्या बरीच कमी झाली आहे आणि परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. पुणे जिल्हा मावळ आणि मुळशी तालुक्यात मोठ्या प्रमाणात हॉटेल आहेत. या तालुक्यांमध्ये देखील विषाणूची फारच कमी प्रमाण आहे.असोसिएशनचे वरिष्ठ सदस्य राहुल रामनाथ म्हणाले की रेस्टॉरंट्स आणि ट्रेडर्सना लॉकडाऊनमध्ये सर्वात जास्त त्रास झाला आहे आणि मी आभार मानतो. एफटीएपीचे अध्यक्ष श्री फत्तेचंद रांका ज्यांनी एफटीएपी पुणे बरोबर समोरून निषेधाचे नेतृत्व करण्यास पुढाकार घेतला त्यांचे मार्गदर्शन आणि नेतृत्व हे कार्य साध्य करण्यासाठी अत्यंत महत्वाचे होते ..