पुणे, दि.१३ :- समर्थ पोलीस स्टेशन हद्दीतील मोटरसायकल चोराला पकडण्यात १२ तासाच्या आत यश आले असून, मोटरसायकल चोरीचे ५ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. पोलिसांनी रेकॉर्डवरील पुण्यातील सराईत गुन्हेगाराकडून मोटरसायकलीसह ताब्यात घेवून जेरबंद केले.मयुर मोतीराम राठोड , वय २३ वर्षे , रा . स.नं. १० , गणेशनगर , सिध्देश्वर मंदीराजवळ , येरवडा पुणे असे अटक करण्यात आलेल्या मोटारसायकल चोराचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, दि.१२ रोजी फिर्यादी यांनी त्यांची हिरो होंडा कंपनीची पॅशन मोटार सायकल चोरी झालेबाबत तक्रार दाखल केली होती . समर्थ पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक , यांचे आदेशाने तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी वाहन चोरीला प्रतिबंध होणेकामी व वाहन चोर पकडणेकामी पेट्रोलिंग करीत असतांना एक इसम संशयित रित्या जात असताना पोलिसांना दिसला व मित्तल कोर्ट जवळ सार्वजनिक रोडवर होंडा पेंशन दुचाकीवर आला असता त्याला अडविल्यानंतर त्याचे गाडीला चावी दिसून आली नाही . त्याचेकडे गाडीचे कागदपत्रावावत विचारणा केली असता तो असमाधानकारक व उडवाउडवीची उत्तरे देवु लागला व त्यास त्याचा नाव व पत्ता विचारला असता त्याने आपले नाव मयुर मोतीराम राठोड , वय २३ वर्षे , रा . स.नं. १० , गणेशनगर , सिध्देश्वर मंदीराजवळ , येरवडा पुणे असे असल्याचे सांगितले . त्यास अधिक चौकशी कामी समर्थ पोलीस स्टेशन येथे आणले आसता व सदर गाडीचा आर.टी.ओ.नंबर एम.एच. १२ डीएम ९०५८ असे असल्याचे निष्पन झाल्याने सदर गाडीबाबत अभिलेख पडताळुन खात्री पोलिसांनी केली असता समर्थ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १४०/२०२१ भा.द.वि.कलम ३७ ९ प्रमाणे गुन्हा दाखल असलेचे समजले . त्याबाबत त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सदरची गाडी मालधक्का चौक , आंबेडकर भवन मंगळवार पेठ पुणे येथून चोरी केल्याची कबुली दिल्याने सदर आरोपीस दाखल गुन्हयात अटक केली आहे . सदर गुन्हयाचा तपास पोलीस नाईक सुभाष पिंगळे हे करीत आहेत . तसेच त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे सखोल तपास केला असता त्याने १० दिवसापूर्वी येरवडा येथून एक होंडा शाईन मोटार सायकल चोरी केलेबाबत सांगीतले आहे . सदर गाडीबाबत येरवडा पोलीस स्टेशन येथे अभिलेख पडताळुन खात्री केली असता येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असलेचे समजले . सदरचा आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर शरीराविरुध्दचे वाहन चोरीचे एकुण ०५ गुन्हे दाखल आहेत . सदरची कामगिरी ही डॉ . संजय शिंदे , अपर पोलीस आयुक्त , पश्चिम प्रादेशीक विभाग , पुणे शहर , श्रीमती प्रियंका नारनवरे , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ १ पुणे शहर , सतिश गोवेकर , सहाय्यक पोलीस आयुक्त , फरासखाना विभाग , पुणे विष्णु ताम्हाणे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , समर्थ पो.स्टे , उल्हास कदम , पोलीस निरीक्षक , ( गुन्हे ) यांचे मार्गदर्शनानुसार सहा . पोलीस निरीक्षक संदीप जोरे , पोलीस अंमलदार संतोष काळे , सुशील लोणकर , सुमित खुट्टे , सुनिल हसवे , विठ्ठल चोरमले , निलेश साबळे , महेश जाधव , सुभाष मोरे , हेमंत पेरणे , शुभम देसाई , नितीन घोसाळकर , जितेंद्र पवार , श्याम सुर्यवंशी , यांनी केली आहे . सुभाष पिंगळे ,