पुणे, दि.१३:- भारत निवडणूक आयोगाने १४ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १२.०० वाजता या कालावधीत २५ सप्टेंबर २०२० ते १५ जुलै २०२१ या कालावधीत नोंदणी केलेल्या मतदारांनी e-EPIC डाऊनलोड करण्याचे आयोजन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मदतीने करण्यात येणार असल्याची माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी परिपत्रकान्वये दिली आहे.
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२१ पूर्वी आणि कार्यक्रमानंतर मतदार नोंदणी करताना एकल मोबाईल क्रमांक नोंदविलेले मतदार e-EPIC डाऊनलोड करण्यास पात्र आहेत. विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२१ नंतर नोंदणी केलेल्या २९ लाख मतदारांची आणि विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२१ अंतर्गत उर्वरित मतदारांची मतदार यादीमध्ये एकल मोबाईल क्रमांक नोंदविलेले यादी मतदारांच्या मोबाईल दूरध्वनी क्रमांकासह CDAC ही संस्था उपलब्ध करणार आहे.
या कामकाजास कालमर्यादा असून एका तासाच्या कालावधीतच कार्यक्रमाची अंमलबजावणी याच वेळेत करण्याची दक्षता घ्यावी असेही आयोगाचे निर्देश आहेत, असेही उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी कळविले आहे.
मतदारांना 14 ऑगस्ट रोजी e-EPIC डाऊनलोड करण्याचे आवाहन
पुणे, दि.13:- भारत निवडणूक आयोगाने १४ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १२.०० वाजता या कालावधीत २५ सप्टेंबर २०२० ते १५ जुलै २०२१ या कालावधीत नोंदणी केलेल्या मतदारांनी e-EPIC डाऊनलोड करण्याचे आयोजन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मदतीने करण्यात येणार असल्याची माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी परिपत्रकान्वये दिली आहे.