पुणे, दि.१९ :- पुणे शहर पोलिस आयुक्तलायाच्या गेट समोर स्वतःला पेटवून घेऊन घेणार्याचा उपचारादरम्यान आज दि.१९ रोजी मृत्यू झाला आहेयाबाबत पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे. सुरेश विठ्ठल पिंगळे (रा. खडकी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सुरेश पिंगळेने पोलिस आयुक्तालयाच्या गेटवरच ज्वलनशील पदार्थ अंगावरून टाकून पेटवून घेतले होते. त्यामध्ये तो गंभीररित्या भाजला होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
आयुक्तालयाच्या गेटवर पेटवून घेतल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. बंडगार्डन पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीररित्या जखमी झाल्यामुळे पिंगळेला फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सुर्या हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज (गुरूवार) उपचारादरम्यान पिंगळे यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.