श्रीगोंदा:-तालुक्यातील मढेवडगांव येथील यशोदानंदन दुध डेअरीचे चेअरमन संतोष दादा मांडे यांची मढेवडगांव गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
या समितीच्या माध्यमातून गावातील अनेक वाद-विवाद गावातच मिटवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहतात.या निवडी बद्दल ग्रा.प.कार्यालय मढेवडगांवच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी मढेवडगांव ग्रामपंचायतचे उपसरपंच दिपक गाडे यांच्या उपस्थितीत ही तंटामुक्ती समिती अध्यक्षपदाची निवड संपन्न झाली.यांच्या नावाची सूचना लक्ष्मण मांडे यांनी केली तर अमोल गाढवे यांनी अनुमोदन दिले.संतोष मांडे यांच्या निवडीबद्दल मा.उपसरपंच गणेश मांडे, भगवान धावडे, अमोल गाढवे, हनुमंत जाधव, काळूराम ससाणे, संदीप मांडे, लक्ष्मण मांडे, गणेश वाबळे, राजेंद्र मांडे, अजय मांडे, सचिन शिंदे, विनोद जाधव, जावेद तांबोळी,शेखर वाबळे, अविनाश उंडे, विक्रम मांडे,भाऊसाहेब शिंदे, तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे