पुणे, दि.२२:-वाघोली येथील पीक कर्ज (किसान क्रेडिट कार्ड- प्रकरण मंजूर करण्यासाठी 5 हजार रूपयांची लाच घेणार्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या शाखा-वाघोली पद-विकास अधिकार्यासह बोल्हाई विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सचिवास लाच लचुपत प्रतिबंधक विभागाने आज दि २२ रोजी वाघोलीमध्ये रंगेहाथ पकडले आहे.याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वाघोली शाखेतील पद-विकास अधिकारी दीपक रामचंद्र सायकर आणि बोल्हाई विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित, वाडेबोल्हाईचे सचिव गोपीनाथ दत्तात्रय इंगळे अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत. तक्रारदार यांना पीक कर्ज किसान क्रेडिट कार्ड हवे होते. ते प्रकरण मंजूर करण्यासाठी आरोपींनी 5 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. 5 हजाराची लाच घेताना गोपीनाथ इंगळे यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे त्या दोघांवर लोणीकंद पोलीस स्टेशन , पुणे शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आले आहे गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक.श्रीराम शिंदे ला.प्र.वि. पुणे युनिट हे करत आहेत .सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे , ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र व. अपर पोलीस अधीक्षक . सुरज गुरव , ला.प्र.वि. पुणे , सुहास नाडगौडा , अपर पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली . शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालय क्रमांकवर १. हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४ २. ॲन्टीकरप्शन ब्युरो , पुणे – दुरध्वनी क्रमांक – ०२० – २६१२२१३४ , २६१३२८०२ , २६०५०४२३ ३. व्हॉट्स अॅप क्रमांक पुणे – ७८७५३३३३३३ ४. व्हॉट्स अॅप क्रमांक मुंबई – ९९ ३० ९९ ७७०० सपंर्क साधण्याचे आवाहन राजेश बनसोडे , पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे .