श्रीगोंदा,दि २३ :- ढवळगावं येथे महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास योजनेच्या अंतर्गत सकस आहार पोषण महा (महिना) या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत आणि आंगणवाडी महिला बालकल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने ढवळगाव येथील गुरुकृपा मंगल कार्यालयात पार पडला.या कार्यक्रमासाठी अतिशय सुंदर पद्धतीने जनजागृती करणारी शुभक रांगोळी, आणि लहान मुलांनी कुपोषणावर कशी मात करता येते याचे मार्गदर्शन करण्यासाठी लताताई वाघमारे,अलकाताई वाघमारे,चित्रा वेताळ,हौसाताई बनकर,अनिता जाधव यांनी नाटिका सादर केली,तसेच आहार वाटप ,आहाराचे प्रदर्शन करून अतिशय छान पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य कोमलताई वाखारे,पंचायत समिती सदस्य कल्यानीताई लोखंडे,एकात्मिक बाल विकास देवदैठण गणाच्या पर्यवेक्षिका एखांडे मॅडम,सरपंच सारिका शिंदे, मा.सरपंच रवि शिंदे , मा.चेअरमन गौतम वाळूंज, माजी ग्रामपंचायत सदस्य पत्रकार अमोल बोरगे,जावेद खान,ग्रामसेवीक सरला महाडिक,सिताबाई ढवळे, तसेच सुधा शिंदे,स्वाती नलगे, अलका बोरगे,मंदा शिंदे, देवदैठण,हिंगणी,येवती,अरणगाव, कोंडेगव्हाण,गव्हाणवाडी, येथील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस व आरोग्य सेविका आशा सेविका व डॉक्टर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्रगती बनकर व कार्यक्रमाचे आभार एकात्मिक बाल विकास देवदैठण गणाच्या पर्यवेक्षिका एखांडे मॅडम यांनी मानले.
गोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे