पुणे, दि१० :- उद्या सोमवार दिनांक. 11 ऑक्टोबर 2021 रोजी महाराष्ट्रातील तीन सत्तारूढ पक्षांनी पुकारलेल्या बंदला उद्योजक व व्यापाऱ्यांचा विरोध !कोरोनातून आताच आपण सर्व व्यापारी आणि उद्योजक कुठेतरी जेमतेम बाहेर पडत आहोत.आणि सणासुदीच्या काळात अचानकपणे सरकार ज्यांचे आहे त्यांनीच मधेच बंद जाहीर करणे योग्य नाही.जी घटना उत्तरप्रदेशात घडली त्याघटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो त्याचे समर्थन कुणालाही करता येणार नाही.आपण आंदोलन करा मोर्चे काढा पण संपूर्ण महाराष्ट्र बंद करू नका बंद करून उद्योजक व्यापार्यांच्या जखमेवर मिठ चोळू नका व महाराष्ट्रातील तमाम जनतेला बंद करून वेठीस धरू नका.सरकार आपलेच आहे पोलीसही आपलेच आहे आणि बंद देखील आपल्याच सरकारमधील तिन्ही पक्षांनी केला आहे बंद पुकारणारेच बंदची सत्तेचा दुरुपयोग करुन अंमलबजावणी करणार?.आम्ही दाद कोणाकडे मागायची ?आधीच नुकसानग्रस्त असतांना पावसाने जिवनमान अडचणीत आलेले असताना सगळ्यांना मदतीची गरज असतांना त्यातच बंद पुकारणे म्हणजे निर्लज्ज पणाचा कळसच म्हणावा लागेल .शेतकऱ्यांपासून लघुउद्योग, व्यापारी व ज्यांचे हातावर पोट आहे ह्या सर्वाना नुकसान भरपाई कोण देणार?
त्यामुळे उद्योजक व्यापारी जनतेने दबावाखाली न येता आपापले उद्योग व्यापार सुरु ठेउन राष्ट्र सेवेचे कार्य अविरत चालू ठेवावे असे आवाहन भाजपा उद्योग आघाडी, महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने करण्यात येत आहे.