पिंपरी चिंचवड,२६ : – चाकण – तळेगाव परिसरातील असलेल्या जी पी पारसिक सहकारी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. ही घटना सोमवारी (दि. 25) सकाळी सव्वाआठ वाजता घडली. पोलिसांनी पंजाब येथील टोळीच्या तिघांना अटक केली आहे.लखवीरसिंग बलदेवसिंग (वय 27, रा. रायखाना, ता. गोडमंडी, जि. बढेडा, पंजाब), रमेशकुमार लाजपत्राय चावला, वय 48, रा. परसराम नगर, जि. बढेडा, पंजाब), सिंधरसिंग मख्खनसिंग गगू (वय 34, रा. चंदसर बस्ती, जि. बढेडा, पंजाब) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी बालाजी
रामराव सुडे (वय 63, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण-तळेगाव रोडवर तळेगाव स्टेशन येथे जी पी पारसिक सहकारी बँक आहे. त्या बँकेच्या शेजारी बँकेचे एटीएम आहे. आरोपी लखवीरसिंग याने एटीएम सेंटरमध्ये घुसून स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. त्याच्या दोन साथीदारांनी त्याला मदत केली. हा प्रकार बँकेच्या लक्षात आल्याने लगेच पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी आरोपींना जागीच पकडले. सदर कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे पोलीस उपायुक्त आनंद भेईटे परि . ०२ , सहायक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील देहुरोड विभाग , प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि अजय भोसले , पोहवा कदम , पोना भालेराव , पोशि . मिसाळ , तारू , ओव्हाळ यांनी केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि ज्ञानेश्वर झोल हे करत आहेत .