पुणे दि १५ :- बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघातील तिन्ही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या गाळप झालेल्या ऊसाची बीले अदा न केल्यामुळे पुणे येथील साखर संकुल, साखर आयुक्त कार्यालयासमोर आज दि, १५ मंगळवार रोजी सकाळी ११ वाजल्यापासून माजलगाव तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना माजलगाव तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली येथील शेकडो शेतकरी व शिवसैनिकांनी रसवंती आंदोलन सुरु केले आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, माजलगाव मतदारसंघातील जय महेश साखर कारखाना पवारवाडी, छत्रपती सहकारी साखर कारखाना सावरगाव आणि लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना तेलगाव या तिन्ही कारखान्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या ऊस गाळपास सुरुवात केली मात्र दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला असून कारखान्यांना १५ दिवसात ऊस बील देणे देणे बंधनकारक असताना देखिल अद्याप शेतकऱ्यांना ऊस बीलाचे पैसे न मिळाल्याने या तिन्ही कारखान्यांच्या विरोधात शिवसेनेचे माजलगाव तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव, शिवसैनिक आणि शेकडो शेतकऱ्यांचे आज दि, १५ पासून शिवाजीनगर पुणे येथील साखर संकुल साखर आयुक्त कार्यालयासमोर शिवसेना बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली माजलगावचे शिवसेना तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली वडवणी तालुकाप्रमुख संदीप माने, रामदास ढगे, रमेश सर, दयानंद शिंदे, नामदेव सोजे, मुंजाबा जाधव, तिर्थराज पांचाळ, अनिल धुमाळ, हनुमान सरवदे, उध्दव धुमाळ, महेश खेटे, गजानन गिराम, महादेव सुरवसे, गणेश राऊत, निलेश मुळे, गणेश शिंदे, शिवाजी सावंत, जयराम राऊत, नाना बामपारे, गोविंद काळे, करण थोरात आदीसह शिवसैनिक शेकडो शेतकऱ्यांनी ‘रसवंती आंदोलन’ आजपासून सुरु केले आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बीले जमा होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहील असा इशारा तालुकाप्रमुख जाधव यांनी साखर आयुक्तांना दिला आहे.