• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, July 3, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते घाडगेवाडी येथील पतसंस्थेच्या नवीन इमारतींचे उद्घाटन

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
14/11/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

बारामती दि.१४ :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील घाडगेवाडी विविध कार्यकारी सोसायटी आणि त्रिंबक विविध कार्यकारी सोसायटीच्या नवीन इमारतींचे उद्घाटन करण्यात आले..यावेळी बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती पंचायत समिती सभापती नीता फरांदे, घाडगेवाडी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सतीश चव्हाण, त्रिंबक सोसायटीचे संस्थापक चेअरमन बाबुराव चव्हाण आदी उपस्थित होते.
श्री. पवार यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि भारताचे आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाले, घाडगेवाडी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पतसंस्था अ वर्गामध्ये येण्यासाठी प्रयत्न करावेत. विकास सोसायट्या ह्या ग्रामीण भागाच्या आर्थिक नाडया आहेत. शेतकऱ्यांना या सोसायट्यांचा फायदा होऊन ग्रामीण भागात आर्थिक सुब्बत्ता आली पाहीजे.
त्रिंबक विविध कार्यकारी सहकारी संस्थेने पारदर्शक आणि लोकाभिमूख काम करुन संस्थेची प्रगती करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कोरोनाबाबत बोलतांना श्री. पवार म्हणाले की, सर्व नागरिकांनी दोन्ही लसीचे डोस घेणे आवश्यक आहे. कोरोना संसर्ग अजून गेलेला नाही. सर्वांनी मास्क वापरणे, कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. चिन व रशियामध्ये पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. लस घेतल्याने अपाय होत नाही. लसीकरणाबाबत सर्व संस्थांनी प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.मेखळी येथील नामदेव सहकार भवन इमारतींचे उद्घाटनउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील मेखळी येथील नामदेव बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या ‘नामदेव सहकार भवन’ या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी नामदेव सहकारी पतसंस्थेचे चेअरमन मारुतराव देवकाते, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब तावरे, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप आदी उपस्थित होते.संस्थेत सामाजिक बांधिलकीच्या भावानेने काम होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

बारामती येथील विकासकामांची पाहणी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती परिसरातील विविध विकास कामांची पाहणी करून अधिकाऱ्यांना कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
श्री. पवार यांनी आज मौजे कन्हेरी येथील बारामती तालुका फळ रोप वाटीका, कन्हेरी गावठान येथील रस्त्यांचे काम, पंचायत समितीच्या नवीन इमारत, तीन हत्ती चौक येथील कॅनलवरील ब्रीज, ख्रिच्छन कॉलनी येथील कॅनलवरील पुलाचे सुरू असलेल्या कामांची कामाची पाहणी केली.
यावेळी एकात्मिक विकास समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी महेश रोकडे आदी उपस्थित होते.

Tags: सोशल मिडिया
Previous Post

पुणे जिल्ह्यात जमावबंदी अन् कलम 144 लागू, सोशल मीडियावर जातीय तणाव निर्माण करणाऱ्या पोस्ट , अफवा , चुकीची माहिती पसरवणाऱ्यावर होणार कारवाई

Next Post

भाजप हटाव – देश बचाव’ चा नारा देत शहर कॉंग्रेसचे ‘हाहाकार’ जनजागरण अभियान सुरु

Next Post

भाजप हटाव - देश बचाव’ चा नारा देत शहर कॉंग्रेसचे ‘हाहाकार’ जनजागरण अभियान सुरु

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist