पुणे, दि.१५ :- ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्यात रविवारी दुबईत T20 वर्ल्ड कपचा फायनल सामना पार पडला. सामना यात न्यूझीलंडचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकला. दरम्यान या सांगण्यावर पुण्यातून ऑनलाईन पद्धतीने बॅटिंग घेणाऱ्या दोघांना पुणे शहर गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने अटक केली.बिबेवाडीतील विष्णू विहार सोसायटीत ही कारवाई करण्यात आली.ओमकार राजू समुद्रे (वय 25) आणि निकित अजित बोथरा (वय 26) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून 4 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्ल्डकपच्या फायनल सामन्यावर बेकायदेशीररित्या ऑनलाइन बेटिंग चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या व सामाजिक सुरक्षा विभागाने बिबेवाडीतील विष्णू विहार अपार्टमेंटमध्ये फ्लॅट क्रमांक 4 वर छापा टाकला. यावेळी त्यांना पुढील आरोपी न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या क्रिकेटच्या सामन्यावर ऑनलाइन पद्धतीने मोबाईल लॅपटॉप द्वारे जुगाराचा खेळ खेळताना दिसून आले. पोलिसांनी दोघांना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.सदरची कारवाई पोलीस आयुक्त , पुणे शहर अमिताभ गुप्ता , सह पोलीस आयुक्त , पुणे शहर , डॉ . रविंद्र शिसवे , अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे रामनाथ पोकळे , पोलीस उप आयुक्त गुन्हे. श्रीनिवास घाडगे , यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण सामाजिक सुरक्षा विभाग , गुन्हे शाखा , पुणे शहर तसेच सासुवि गुन्हे शाखे कडील पोउपनि श्रीधर खडके , महिला पोलीस अंमलदार शिंदे , पुकाळे , पोलीस अंमलदार माने , मोहिते , कांबळे , चव्हाण , कोळगे यांनी केली आहे .