पुणे,दि.२७ :- पुण्याहून अयोध्येसाठी रामपथ यात्रा स्पेशल ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला असून ही ट्रेन पुण्याहून आज अयोध्येला रवाना. सुरु करण्यामागील मुख्य कारण म्हणजे ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देणे आहे. त्याचसोबत यामध्ये ग्रामीण भागातील काठी ठिकाणे ७ दिवस ८ रात्रीसाठी फिरता येणार आहेत. या ट्रेनमध्ये स्लिपर क्लार आणि एसी-३ टियरचे कोच असणार आहेत.
IRCTC ने राम भक्तांसाठी स्पेशल टुरिस्ट ट्रेन चालवली आहे. या ट्रेनच्या माध्यमातून प्रवाशांना अयोध्या ते चित्रकूट आणि वाराणसी अशा एकूण सहा शहरांमध्ये अत्यंत कमी खर्चात तीर्थयात्रा करता येणार आहे. भारतीय रेल्वेच्या या ट्रेनचे नाव रामपथ यात्रा स्पेशल टुरिस्ट ट्रेन असून याअंतर्गत प्रवाशांना सात रात्री आठ दिवसांचे प्रवास पॅकेज दिले जाणार आहे.
यासंदर्भात माहिती देत रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक रेणू शर्मा म्हणाल्या की,’या ट्रेनच्या शुभारंभाचे उद्दिष्ट तीर्थक्षेत्र पर्यटनाला चालना देणे, ७ दिवस आणि ८ रात्रीच्या सहलीत तीर्थक्षेत्रे कव्हर करणे हे आहे. ही ट्रेन स्लीपर क्लास आणि एसी-3 टियरसह चालेल.’दरम्यान, या पॅकेजअंतर्गत स्लीपर आणि थर्ड एसी अशा दोन श्रेणी निवडल्या जाऊ शकतात. स्लीपर निवडण्यासाठी प्रति व्यक्ती ७,५६० रुपये मोजावे लागतील. त्याचप्रमाणे, थर्ड एसी निवडण्यासाठी प्रति व्यक्ती १२,६०० रुपये मोजावे लागतील. या पॅकेजअंतर्गत रेल्वे प्रवास, धर्मशाळा किंवा सामान्य हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, ऑन-साईट पाहणे आणि नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण दिले जाईल. तपशीलवार माहितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट पाहू शकता. ही ट्रेन २५ डिसेंबर २०२१ ते १ जानेवारी २०२२ पर्यंत दररोज धावेल. या पॅकेजअंतर्गत प्रवासी सात रात्री आठ दिवस प्रवास करतील