पुणे ग्रामीण,दि.०२:- पुणे ग्रामीण परिसरातील कामशेत येथील दहशत निर्माण करुन खुनाचा प्रयत्न, खंडणी उकळणे असे गुन्हे करणार्या धनेश उर्फ चॉकलेट शिंदे , व त्यांच्या टोळीतील इतर ४ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.धनेश उर्फ चॉकलेट शिंदे , रोशन उर्फ डिग्या शिंदे , अनिकेत शिंदे , श्रीधर हुले , रिंकु दाभाडे सर्व रा.कामशेत , ता.मावळ , जि . पुणे अशी मोक्का कारवाई केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.शिंदे व त्यांच्या टोळीवर ८ गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधकात्मक कारवाई केल्यानंतरही त्यांनी पुन्हा गुन्हे केले आहे. त्यांची कामशेत पोलीस ठाण्याच्या परिसरात दहशत आहे. ते लोकांना दमदाटी करणे, खुनाचा प्रयत्न , जबर दुखापत करणे, प्राणघातक हत्यार विना परवाना जवळ बाळगणे, खंडणी मागणे अशा प्रकारचे गुन्हे करीत असतात.प्रस्ताव कामशेत पोलीस स्टेशन येथुन पोलीस अधीक्षक , पुणे ग्रामीण यांचे मार्फत. विशेष पोलीस महानिरीक्षक , कोल्हापूर परिक्षेत्र , कोल्हापूर यांचे कार्यालयात सादर करण्यात आला होता . विशेष पोलीस महानिरीक्षक , कोल्हापूर यांनी नमुद प्रस्तावास मंजुरी दिल्याने कामशेत पोलीस स्टेशन सदर गुन्हा गुन्हयातील मुख्य आरोपी टोळी प्रमुख १ ) धनेश उर्फ चॉकलेट दिलीप शिंदे , वय २ ९ वर्षे , रा . कामशेत , ता . मावळ , जि.पुणे त्याचे टोळीतील सदस्य २ ) रोशन उर्फ डिग्या बाळु , शिंदे २२ वर्षे , रा . कामशेत , ता.मावळ , जि.पुणे , ३ ) अनिकेत संभाजी शिंदे , वय १ ९ वर्षे , रा . कामशेत ता . मावळ , जि . पुणे ४ ) श्रीधर श्रीकांत हुले , रा . कामशेत , वय २१ वर्षे , ता.मावळ , जि . पुणे यांच्या वर मोक्का कायदया अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे सदरची कारवाई हि अभिनव देशमुख , पोलीस अधीक्षक , पुणे ग्रामीण , मितेश गट्टे , अपर पोलीस अधीक्षक , पुणे ग्रामीण व राजेंद्र पाटील , उप विभागीय पोलीस अधिकारी , लोणावळा विभाग , लोणावळा यांचे मार्गदर्शनाखाली कामशेत पोलीस स्टेशन , संजय जगताप , पोलीस निरीक्षक , आकाश पवार , सहा . पोलीस निरीक्षक , कामशेत पोलीस स्टेशन , शुभम चव्हाण , पोलीस उपनिरीक्षक , श्रीमती पी.डी. माने , पोलीस उपनिरीक्षक , सहा . पोलीस उपनिरीक्षक ए . ए . शेख , पो.हवा . ए.जे. दरेकर , पो.हवा . एस . ए . शेख , पो.हवा . एम . आर . माने , पो.हवा . जी . डी . तावरे , पो.ना. एम . व्ही.धेंडे , कामशेत पोलीस स्टेशन , पो.ना. एच . बी . माने , पो.ना. एस . बी . गवारी , पो.ना. पी . आर . विरणक , पो.ना. एच.डी. वाळूज , पो.ना. ए . एस . हिप्परकर , पो.कॉ. ए . व्ही . झगडे , पो . कॉ . जी . के . केदारी , पो.कॉ. व्ही . व्ही . नागलोथ , म.पो.कॉ. एस . एच . कुंदे , चा . पो . ना . डी . एच . शिंदे , चा.पो.कॉ. आर . आर . राउळ , सदर गुन्हयाचा तपास राजेंद्र पाटील , उपविभागीय पोलीस अधिकारी , लोणावळा विभाग , लोणावळा हे करीत आहेत . , ,