पुणे, दि०२ :-पुणे शहरातील हडपसर-बिबवेवाडी येथील दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासून महिलेचा शोध सराफाच्या दुकानामध्ये अंगठी खरेदीच्या बहाण्याने अंगठ्या चोरणाऱ्या महिलेला हडपसर पोलिसांनी अटक केले. तिच्याकडून सहा लाख २३ हजार रुपयांच्या १२ सोन्याच्या अंगठ्या जप्त केल्या.पूनम परमेश्वर देवकर (वय ४२, रा. बिबवेवाडी, पुणे) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याविरुद्ध विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.पोलिसांनी सांगितले की, हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मगरपट्टा येथील चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लिमिटेड आणि पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स यांच्या दुकानात ४२ वर्षीय महिलेने काऊंन्टरवर सोन्याचे अंगठी दाखविण्यास सांगितले. अंगठी पाहत असताना हातचलाखीने त्या ठिकाणी बनावट अंगठी ठेवून सोन्याची खरी अंगठी चोरून नेल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली.दरम्यान, अशा प्रकाराच्या गुन्ह्राच्या पद्धतीची माहीती घेतली असता, रविवार पेठ, कोथरूड, चिंचवड, चाकण, भोसरी, सहकारनगर येथील चंदुकाका सराफ, पु. ना. गाडगीळ, रांका ज्वेलर्स, मलबार, ब्ल्यू स्टोन अशा सराफी दुकानांच्या शाखेत गुन्हे घडल्याचे उघडकीस आले. त्यानुसार महिलेने पुणे शहरातील इतर चोऱ्यांचे गुन्हे केल्याची माहिती सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून मिळाली. त्यानुसार ही महिला सोन्याचे अंगठी पाहण्याचा बहाणा करून हातचलाखीने बनावट अंगठी खरी सोन्याची अंगठी काढून घेऊन निघून जात असल्याचे फुटेजमध्ये दिसून आले.तपासपथक महिला पोलीस अंमलदार ३० नोव्हेंबर रोजी सराफी दुकानांच्या परिसरात पेट्रोलींग करीत असताना संशयित महिला दिसून आली. तिला ताब्यात घेताच तिने रविवार पेठ, कोथरूड, चिंचवड, चाकण, भोसरी, सहकारनगर इत्यादी ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केली असल्याची कबुली दिली. त्या महिलेकडून एकुण वेगवेगळ्या ठिकाणच्या चोरी केलेल्या सहा लाख २३ हजार २३८ रुपयांच्या १२ सोन्याच्या अंगठ्या जप्त केल्या.
आरोपी महिला २००५-०६ मध्ये अष्टेकर ज्वेलर्स, लक्ष्मीरोड या ठिकाणी सेल्समन म्हणून दुकानात कामास होती. तेथे काम करीत असताना चोरी केल्यामुळे विश्रामबाग पोलीस ठाणेस गुन्हा दाखल झालेला होता. महिलेस सराफी दुकानातील कामाचा अनुभव असल्याने सोन्याचे दागिन्यावर स्टिकर कसे लावायचे याबाबत माहिती असल्याचा फायदा घेत सोन्याच्या अंगठ्या चोरल्याचे तपासात उघड झाले आहे. हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे पुढील तपास करीत आहेत. सदरची कामगिरी ही नामदेव चव्हाण , अप्पर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व नम्रता पाटील , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ ५ पुणे शहर , यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली कल्याणराव विधाते , सहाय्यक पोलीस आयुक्त , हडपसर विभाग पुणे , अरविंद गोकुळे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन , पुणे शहर , पोनि ( गुन्हे ) राजु अडागळे , पोनि ( गुन्हे ) दिगंबर शिंदे यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड , पोलीस उप निरीक्षक सौरभ माने , पोलीस अंमलदार , प्रदीप सोनवणे , गणेश क्षिरसागर , अविनाश गोसावी , संदीप राठोड , समीर पांडुळे , शशिकांत नाळे , सचिन जाधव , शाहीद शेख , प्रशांत दुधाळ , निखील पवार , प्रशांत टोणपे , रियाज शेख , सचिन गोरखे , सुरज कुंभार , महिला पोलीस नाईक पिसे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे .