पुणे, दि०६ :- पुणे परिसरातील दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाच्या जाळ्यात .सराईत गुन्हेगाराकडून तीन लाख रुपये किमतीच्या 7 दुचाकी जप्त केल्या आहेत. गुन्हे शाखेने ही कारवाई अम्रपाली हॉटेल जवळ असलेल्या सार्वजनिक रोडवर केली. आरोपीला अटक करुन पुण्यातील 6 गुन्हे उघडकीस आणले आहेत.अक्षय मारुती कापडी (वय-22 रा. मु. पारगाव शिंगवे, पोस्ट अवसरी बु. ता. आंबेगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अटक केलेल्या आरोपीने स्वारगेट भारती विद्यापीठ, दत्तवाडी कोथरुड , वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरल्या आहेत. पोलिसांनी दुचाकी जप्त करुन 6 गुन्हे उघडकीस आणले आहेत.गुन्हे शाखा युनिट तीनचे पथक वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात पेट्रोलींग करत असताना पोलीस शिपाई ज्ञानेश्वर चित्ते यांना गोपनीय बातमीदारामार्फेत आणि पोलिस शिपाई संजीव कळंबे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणावरुन आरोपीची माहिती मिळाली. आरोपी आम्रपाली हॉटेल शेजारी येथील महामार्गाच्या लगत असलेल्या सर्व्हिस रोडवर उभा असून त्याच्याकडे असलेली के.टी.एम दुचाकी कर्वेनगर यथून चोरली असल्याची माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेली के.टी.एम. दुचाकी जप्त करुन गुन्ह्यात अटक केली. त्याला न्यायालयात हजर करुन त्याची पोलीस कोठडी घेऊन सखोल चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. आरोपीकडून तीन लाख रुपय
किंमतीच्या एकुण ७ दुचाकी जप्त करण्यात आलेल्या असुन स्वारगेट , भारती विदयापीठ , दत्तवाडी , कोथरुड , वारजे माळवाडी पोलीस स्टेशन कडील ६ गुन्हे उघडकीस आणलेले आहेत . ” सदरची कामगिरी ,पोलीस आयुक्त,अमिताभ गुप्ता,पोलीस सह आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे अप्पर पोलीस आयुक्त , गुन्हे , पुणे शहर रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त , गुन्हे , पुणे शहर श्रीनिवास घाडगे , सहा . पोलीस आयुक्त , गुन्हे -१ , पुणे शहर लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा युनिट -३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन , पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे , पोलीस अंमलदार महेश निंबाळकर , संतोष क्षिरसागर , राजेंद्र मारणे , रामदास गोणते , विल्सन डिसोझा , सुजीत पवार , कल्पेश बनसोडे , संजीव कळंबे , ज्ञानेश्वर चित्ते , प्रकाश कटटे , दिपक क्षिरसागर , राकेश टेकावडे , सोनम नेवसे , भाग्यश्री वाघमारे यांनी केली आहे .