पुणे, दि.११:- पुणे शहरातील कोंढव्यातील सैनिक नगर परिसरातील क्लाऊड नाईन सोसायटीमधील बंगल्यात वास्तव्यास राहणार्या जितेन जगदिप सिंग (42) याच्यावर पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने मोठी कारवाई केली आहे.त्याच्या बंगल्यातून विदेशी दारूच्या बाटल्या, पोकर जुगाराची साधने, 46 लाख 76 हजार 500 रूपये आणि ऑस्ट्रेलियन 5500 डॉलर तसेच 6700 युएस डॉलर असा एकुण 58 लाख 30 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.जितेन जगदिप सिंग हा पोकर खेळत असून त्याच्याकडे जुगार खेळण्यास येणार्यांना तो विदेशी दारू पुरवित असल्याची गोपीनय माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना मिळाली होती. सामाजिक सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण आणि अंमली पदार्थ विरोधी पथक – 1 चे निरीक्षक विनायक गायकवाड यांनी प्राप्त माहितीची खातरजमा केली. जितेन सिंग याच्या बंगल्यातील आणि त्याच्याकडे असलेल्या विदेशी दारूच्या बाटल्या, पोकर जुगाराची साधने, 13 पोकर टेबल, 30 पत्त्याचे कॅटचे बॉक्स आणि रोख 47 लाख 76 हजार 500 रूपये तसेच विदेशी चलन असा एकुण 58 लाख 30 हजार 275 रूपयाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. जितेन सिंग याच्याविरूध्द कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. सदरची कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता ,अपर पोलीस आयुक्त , गुन्हे पुणे रामनाथ पोकळे , पोलीस उप आयुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे , यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण सामाजिक सुरक्षा विभाग , गुन्हे शाखा , पुणे शहर , पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड अंमली पदार्थ विरोधी पथक- १ , सासुवि गुन्हे शाखेकडील पोउपनि श्रीधर खडके , परिविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक रेश्मा साळुंखे शिवाजीनगर पो स्टे , विशाल शिंदे स्वारगेट पो स्टे , सचिन तरडे उत्तमनगर पो स्टे , सामाजिक सुरक्षा विभागाकडील महिला पोलीस अंमलदार मोहिते , पुकाळे , पोलीस अंमलदार मोहिते , चव्हाण , पठाण , कोळगे व अंमली पदार्थ विरोधी पथक -१ कडील पोलीस अंमलदार जाधव , पवार , उत्तेकर , साळुंके , पारधी , शेख , मोहिते यांनी केली आहे .