• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

येरवडा जेलमधील सराईत गुन्हेगारांचा अड्डा उद्ध्वस्त ? पुणे शहर पोलिसांची नामी शक्कल

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
13/12/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि.१३ :- पुणे शहरातील सराईत गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीएनुसार ५० वि कारवाई केल्यानंतर आता त्यांची रवानगी आता येरवडा कारागृहाऐवजी थेट औरंगाबाद आणि नागपूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात येणार आहे.गुन्हेगारांची पुण्यातील येरवडा कारागृहातील साखळी अर्थात सराईत गुन्हेगारांची गँग फोडण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्त यांनी हा निर्णय घेतला आहे. पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनीच हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भाईगिरीसह दादगिरी करीत पुण्यातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्यांविरुद्ध एमपीडीएनुसार कारवाई करण्यात येते. त्यानंतर त्यांची एक वर्षभरासाठी येरवडा कारागृहात रवानगी करण्यात येते. पण हे सगळे गुंड येरवडा जेलमध्येच एकत्र येतात आणि तिथूनच आपआपल्या गँग ऑपरेट करु लागतात. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.कारागृहातूनही सराईत गुन्हेगार सक्रिय पुणे शहर
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं की, येरवडा जेल काही सराईत गुंडांसाठी एक अड्डाच बनून जातो. तसेच इतर आरोपींसोबतही त्यांचे लागेबंधे तयार होतात. त्यामुळे कारागृहातूनही सराईत गुन्हेगार सक्रिय असल्याचे दिसून आले होते. येरवडा कारागृहातील सराईतांची हीच साखळी तोडण्यासाठी पुणे पोलीस प्रशासनाने निर्णय घेतला आहे. एमपीडीएनुसार कारवाई केलेल्या सराईतांना औरंगाबाद आणि नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी पाठविले जाणार आहे. त्यामुळे सराईतांचा इतर ओळखीच्या आरोपींसोबत होणारा संपर्क कमी होणार आहे. त्याशिवाय आरोपींना भेटण्यासाठी सहजासहजी संधी निर्माण होणार नाहीत.स्वारगेट हद्दीत दहशत पसरविणाऱ्या आरोपी औरंगाबादच्या कारागृहात स्थानबद्ध दरम्यान, स्वारगेट हद्दीत दहशत पसरविणाऱ्या अट्टल गुन्हेगाराविरुद्ध एमपीडीएनुसार एक वर्ष औरंगाबाद कारागृहात स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. रवींद्र वसंत कांबळे (वय 30, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) असे त्याचे नाव आहे. त्याने साथीदारांसह स्वारगेट, खडक, विश्रामबाग पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तलवार, रॉड, कोयता, बांबूसह जीवघेणी हत्यारे घेऊन खुनाचा प्रयत्न, अपहरण, बाललैंगिक अपराध, जबरी चोरी, दुखापत, जबर दुखापत यांसारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. ‘…तर आम्ही मुस्लिम आरक्षणासाठी महापालिका निवडणूक लढवणार नाही’, इम्तियाज जलील यांची मोठी घोषणा स्वारगेटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी कांबळेविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी प्रस्तावाची पडताळणी करुन त्याला औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले. दरम्यान, मागील एक वर्षाच्या कालावधीमध्ये ५० गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध केले आहे.पुणे पोलीस आयुक्तांची प्रतिक्रिया याबाबत अधिक माहिती देताना पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले की, सराईतांविरुद्ध एमपीडीएनुसार कारवाई केल्यानंतर शिक्षेसाठी त्यांना औरंगाबाद आणि नागपूर मध्यवर्ती कारागृहात पाठविले जाणार आहे. त्यांची येरवडा कारागृहातील तयार होणारी साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईताची औरंगाबाद कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Previous Post

पाठीमागून धडक देऊन जबरी चोरी करणाऱ्या सराईत चोरटा कर्जत पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

श्रीगोंदयात शरदचंद्रजी पवार यांच्या नावाने मागासवर्गीय वसतिगृहाचे भूमिपूजन संपन्न

Next Post

श्रीगोंदयात शरदचंद्रजी पवार यांच्या नावाने मागासवर्गीय वसतिगृहाचे भूमिपूजन संपन्न

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist