पिंपरी.चिंचवड,दि.१८ :- बालेवाडी हिंजवडी भुजबळ चौक परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभाग व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने पर्दाफाश केला आहे.पथकाने केलेल्या कारवाईत पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई वाकड येथील ब्लॉसम सलून अँड स्पा सेंटर येथे शुक्रवारी (दि.17) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास केली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे शहरातील स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या गोरख धंद्याचा पर्दाफाश झाला आहे.
स्पा सेंटरचा चालक-मालक सचिन सुरेश भिसे (वय-33 रा. शिरढोण, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद), स्पा सेंटरची मॅनेजर, अभय मारुतीराव छिद्री (वय-40 रा. रहाटणी, काळेवाडी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी महिला पोलीस शिपाई सोनाली विलास माने (वय-27) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन भिसे आणि मोहिनी यांनी 5 महिलांना पैशांचे आमिष दाखवून
त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले.
यासंदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करुन 5 पीडित महिलांची सुटका केली.
आरोपी अभय छिद्री याने त्याच्या नावावर असलेली जागा कोणतेही अॅग्रीमेंट न करता आरोपी सचिन आणि मोहिनी यांना उपलब्ध करुन दिली.
त्यांनी या जागेवर स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु केला.
वेश्या व्यवसायासाठी जागा उपलब्ध करुन दिल्या प्रकरणी जागा मालक अभय छिद्री
याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सिसोदे करीत आहेत.पुढील तपास वाकड पोलीस स्टेशन करीत आहे .सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश , अप्पर पोलीस आयुक्त डॉ . संजय शिंदे, पोलीस उप – आयुक्त ( गुन्हे ) काकासाहेब डोळे , सहा .पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण , सपोनि अशोक डोंगरे , प्रदिपसिंग सिसोदे , पोउपनि धैर्यशिल सोळंके , पोलीस अंमलदार विजय कांबळे , किशोर पढेर , संतोष बर्गे , नितीन लोंढे , मारुती करचुंडे , गणेश कारोटे , भगवंता मुठे , जालिंदर गारे , सचिन गोनटे , संगिता जाधव , राजेश कोकाटे , अतुल लोखंडे , सोनाली माने , योगेश तिडके यांनी केली आहे .