पुणे,दि.१९ :- पाषाण येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष भुजंग गायकवाड यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ( आठवले गट ) पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे . केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व अविनाश महातेकर यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली हि निवड करण्यात आली . या निवडीचे पत्र परशुराम वाडेकर ( अध्यक्ष , पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडी ) , बाळासाहेब जानराव ( प्रदेश सचिव ) व शहर अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत नुकतेच देण्यात आले . तळागाळातील लोकांपर्यंत पक्षाची ध्येयधोरणे पोहचवून सामान्य जनतेला न्याय देण्याचे व पक्षाला बळकटी देण्याचे काम करणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले .