पुणे,दि.२२ :-रेल्वे कॉटर्स , रमाबाई आंबेडकर रोड येथील अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई करून रोख रक्कम ७६ हजार ७९० रुपये व मुद्देमाल जप्त केला असून
४० जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.पुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारी मोडीत काढण्याबरोबरच अवैध धंद्याकडे लक्ष केंद्रित केले असून, त्याअनुषंगाने त्यांनी अधिकाऱ्यांना कारवाईबाबत आदेशित केले आहे.पुणे रेल्वे स्टेशन येथील रेल्वे कॉटर्स , रमाबाई आंबेडकर रोड पुणे येथे सोमवारी (ता. २०) २०/४५ वाजता छापा टाकुन अवैधरीत्या जुगार खेळवत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. याअनुषंगाने येथे जुगार चालु असल्याबाबत वरिष्ठांनी माहीती देवुन बंडगार्डन पोलिस ठाणे हददीत अवैध धंदयावर कारवाई करण्याबाबत आदेशीत केलेने गुन्हे शाखा युनिट ३,४ व अंमली पदार्थ सुभाषनगर नवी खडकी , येरवडा , पुणे हा सोरट , जुगार मटका घेताना , तसेच सोरट व मटका , जुगार घेणारे व खेळणारे असे एकुण ४० इसम मिळुन आले. या कारवाईत ७६ हजार ७९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला असून, ४० जुगाऱ्याना अटक करण्यात आली
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर , अमिताभ गुप्ता ,पोलीस सह – आयुक्त डॉ .रविंद्र शिसवे , अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , गुन्हे शाखा , पुणे , पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे , गुन्हे शाखा पुणे शहर , सहा . पोलीस आयुक्त , गुन्हे -१ , पुणे शहर ,गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट -३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन , विनायक गायकवाड , सहा . पोलीस निरीक्षक ढेगळे , पोलीस उप – निरीक्षक दत्तात्रय काळे , पोलीस उप निरीक्षक जयदीप पाटील , पोलीस अंमलदार महेश निंबाळकर , संतोष क्षिरसागर , राजेंद्र मारणे , विल्सन डिसोझा , सुजीत पवार , संजीव कळंबे , ज्ञानेश्वर चित्ते , प्रकाश कट्टे , दिपक क्षिरसागर , राकेश टेकावडे , युनिट -४ व अंमली पदार्थ गुन्हे शाखेकडील अंमलदार यांनी केली आहे .