पुणे, ता. २२ :- पुणे विद्यापीठ चौकातील, कोंडी टाळण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, बाणेर रस्ता, पाषाण रस्ता, गणेशखिंड रस्ता व इतर प्रभावित रस्त्यावरील वाहतुकीमध्ये बदल केले आहेत. गुरुवारपासून (ता. २३) प्रायोगिक तत्त्वावर हा बदल केला आहे.शहरातील प्रस्तावित मेट्रो मार्गावर ट्रायल रन घेण्यात येणार आहे, त्यासाठी चतुर्श्रुंगी वाहतूक विभागाअंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौक, बाणेर रस्ता, पाषाण रस्ता, गणेशखिंड रस्ता व इतर प्रभावित रस्त्यावरील वाहतुकीमध्ये गुरुवारपासून प्रायोगिक तत्त्वावर पुढील आदेशापर्यंत बदल करण्यात येणार आहे. असा आहे वाहतूक बदल १) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौक-पाषाण रस्ता-पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक कार्यालय-अभिमानश्री पाषाण चौक-बाणेर रस्ता सकाळनगर-यशदा-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक असा रस्ता एकेरी मार्ग केला आहे. शिवाजीनगरकडून विद्यापीठ चौकातून बाणेर व पाषाणकडे जाणाऱ्या वाहनांवरील मार्गाचा वापर करावा. २) पाषाणकडून पुणे विद्यापीठ चौकात जाणाऱ्या वाहनांनी अभिमानश्री पाषाण चौकातून डावीकडे वळून बाणेर रस्त्यावर येऊन