• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ नववर्षानिमित्त पर्यटकांसाठी अनुभवात्मक उपक्रम राबविणार

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
28/12/2021
in ठळक बातम्या, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि२८ :- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या दर्जेदार सोयी सुविधांच्या माहितीसाठी मंत्रालयात उभारले माहिती व आरक्षण केंद्र, केंद्राला पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी दिली भेट

महाराष्ट्रात समुद्र किनारे, जंगले, साहसी पर्यटन, गडकिल्ले, थंड हवेची ठिकाणे अशा विविध प्रकारच्या पर्यटनाच्या संधी उपलब्ध आहेत. यामध्ये नुकतीच जल पर्यटनाचीही भर पडली आहे. राज्यातील अशा वैविध्यपूर्ण पर्यटनाच्या संधींचा पर्यटकांनी लाभ घ्यावा, यासाठी दर्जेदार सोयी सुविधांसह महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) सज्ज असल्याचे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांनी मंत्रालयात त्रिमुर्ती प्रांगणात उभारण्यात आलेल्या माहिती व आरक्षण केंद्र ला भेट देऊन सांगितले.

एमटीडीसीमार्फत पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सेवा आणि सवलतींची मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी आणि मंत्रालयात येणाऱ्या सर्वसामान्य अभ्यागतांना माहिती व्हावी यासाठी मंत्रालय येथील त्रिमुर्ती प्रांगणात २२ डिसेंबर ते २४ डिसेंबर काळात माहिती व आरक्षण केंद्र उभारण्यात आले होते. एमटीडीसीमार्फत शासकीय कर्मचाऱ्यांसाठी विविध योजना तसेच विविध कक्ष आरक्षणावर सवलत दिली जाते. यामध्ये असलेल्या ज्येष्ठ नागरीक सवलत, शैक्षणिक सहल सवलत, माजी सैनिक सवलत, दिव्यांग पर्यटक सवलत, अनिवासी भारतीय (NRI) सवलत, शासकीय व निमशासकीय कर्मचारी सवलत याबाबत तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाराष्ट्रात विविध पर्यटनस्थळी असलेल्या 29 पर्यटक निवासे, 30 उपहारगृहे यांच्या आरक्षणासंबंधीही मंत्रालयात उभारलेल्या या केंद्रामध्ये माहिती देण्यात आली. सोबतच महामंडळाच्या जल, पर्यटन विभागामार्फत कार्यान्वित केलेल्या नाशिक बोटक्लब, गणपतीपुळे बोटक्लब व तारकर्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायविंग अँड ऍक्वाटिक स्पोर्ट्स (IISDA) या संस्थेबाबत माहिती देण्यात आली.
पर्यटन राज्यमंत्री मा. अदिती तटकरे यांनी देखील मंत्रालयातील या दालनाला भेट देऊन पाहणी केली. एमटीडीसीच्या अनेक पर्यटक निवास, सोयी सुविधा आणि सवलतींचा लाभ घेण्याचे तटकरे यांनी आवाहन केले तसेच महामंडळाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

विविधांगी पर्यटन संधींमुळे ‘महाराष्ट्र अनलिमिटेड’ हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे बोधवाक्य आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यात तारकर्ली येथे सुरू झालेली देशातील पहिली स्कुबा डायविंग इन्स्टिट्यूट हे पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरले आहे. समुद्रकिनाऱ्यांसह गडकिल्यांचे ऐतिहासिक पर्यटन, थंड हवेची ठिकाणे, ताडोबासारख्या जंगलांमधून वन्यजीवांचा अनुभव, ऐतिहासिक लेण्या अशी पर्यटकांची विविध आकर्षणाची ठिकाणे राज्यात आहेत. महामंडळामार्फत विविध पर्यटनस्थळांवर राहण्याच्या दर्जेदार सोयींसह अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अशा वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळांवर येऊन पर्यटकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन जयश्री भोज यांनी केले आहे.

सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच मंत्रालयात भेट देणाऱ्या नागरिकांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मंत्रालय प्रांगणात उभारण्यात आलेल्या आरक्षण केंद्राला भेट देऊन शासकीय योजनांचा लाभ घेतला व अधिकाधिक माहिती जाणून घेतली.
सदर माहिती व आरक्षण केंद्र उभारण्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक दिनेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती सहाय्यक सुमीत चौधरी, लेखा सहाय्यक निलेश काथार आणि मार्केटिंग असोसिएट आकांक्षा पिले, उपासना पांडे, जान्हवी भाटिया यांनी योगदान दिले.

नववर्षानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंउळाची सर्व पर्यटक निवासे हाऊसफुल्ल झाली असुन नववर्षाच्या आगमनाचा आनंद पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात मिळणार आहे. सर्व प्रकारची खबरदारी घेवुन शासनाच्या कोरोना विषयक सर्व मार्गदर्शक तत्वांचे आणि सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करून पर्यटक निवासांमध्ये छोटेखानी मनोरंजनाचे आणि सांस्कृतिक कार्यक्रम पर्यटकांच्या सेवेत सादर करण्याचा महामंडळाचा मानस आहे. कोरोना आजाराविरुध्द सर्व प्रकारची खबरदारी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडुन घेण्यात येत आहे. तथापि, पर्यटकांनी निसर्गाचे आणि कोरानाचे भान ठेवुन पर्यटनाचा, नव वर्ष स्वागताचा आनंद घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिपक हरणे यांच्या कडुन करण्यात आले आहे.
. दिपक हरणे,
प्रादेशिक व्यवस्थापक,
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पुणे.

Previous Post

गुरुवारी पुणे शहरातील ‘ काही ‘ ठिकाणी पाणी पुरवठा बंद राहणार

Next Post

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे मंत्रालयात माहीती आणि आरक्षण केंद्र…

Next Post

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे मंत्रालयात माहीती आणि आरक्षण केंद्र…

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist