पुणे, दि.०४ :- पुणे महापािलकेने गुंठेवारीतील बांधकामे नियमित करण्यासाठी प्रक्रीया सुरु केली आहे. यासाठी प्रति चाैरसमीटर क्षेत्रासाठी पाच रुपये इतके शुल्क आकारले जाणार आहे.दि ०३ साेमवारपासून गुंठेवारीची प्रकरणे ऑनलाइन दाखल करण्यास सुरुवात केली जाईल. तीन महीन्याची मुदत दिली गेली आहे, त्यानंतर स्क्रुटीनी केली जाणार असल्याची माहीती पुण्याचे महापाैर मुरलीधर माेहाेळ यांनी पत्रकार परीषदेत माहिती दिली.
गुंठेवारीच्या संदर्भात पुणे महापािलका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित हाेते. यानंतर महापाैर माेहाेळ यांनी पत्रकार परीषदेत माहीती दिली. ते म्हणाले, ”रेड झाेन, बीडीपी, डाेंगरमाथा डाेंगर उतार, ग्रीन झाेन, शेती झाेन, ना विकास झाेन, आरक्षण, विकास आराखड्यातील रस्ते, नदी पात्र, सहकारी जागेतील क्षेत्रावर झालेली गुंठेवारीतील बांधकामे नियमित केली जाणार नाही. विमानतळाच्या सीमाभिंतीपासून शंभर मीटर क्षेत्रात, बाॅम्ब डंबच्या सीमाभिंतीपासून नऊशे मीटर क्षेत्रातील बांधकामे ही संरक्षण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊनच नियमित केली जातील. ”
दाेन बांधकामांमध्ये सामासिक अंतर न साेडलेल्या गुंठेवारीतील बांधकामांना अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासंदर्भात सामासिक अंतराचा नियम शिथील करण्यासाठी कार्यवाही सुरु असल्याचे त्यांनी नमूद केले.
गुंठेवारीची प्रकरणे ही आर्किटेक्चर मार्फतच दाखल करावी लागणार आहे. ही प्रकरणे ऑनलाईन दाखल केली जातील, यामुळे मध्यस्थांकडून नागरीकांची हाेणारी लुट थांबेल. तसेच मान्यताप्राप्त अिभयंत्यांकडूनही प्रस्ताव दाखल करता येणार आहेत.” असे महापाैर माेहाेळ यांनी नमूद केले.
दरम्यान या निर्णयाचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले आहे. गुंठेवारीतील अडचणीसंदर्भात आमदार पाटील यांनीही राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केला हाेता. या निर्णयामुळे महापािलकेला विकास कामासाठी निधी उपलब्ध हाेईल असेही त्यांनी नमूद केले.