पुणे, दि.४ :- नववर्षानिमित्त इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप,रहमत फौंडेशन,हाजराबी पानसरे सोशल फाउंडेशन यांच्यातर्फे कोंढवा येथे विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले होते .
3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त पुणे महानगरपालीका आरोग्य विभाग आणि उप आयुक्त डॉ.कल्पना बळीवंत याच्या सहभागातून कोंढवा खुर्द आक्सा मस्जीद (संडे बाजार) येथे सायंकाळी ‘ बेटी पढावो,बेटी बचावो’ हा उपक्रम घेण्यात आला. मनपा आरोग्य अधिकारी डॉ . भोसले, सामाजिक कार्यकर्त्या संध्या देशपांडे, सर्वोदय मंडळ चे माजी पुणे शहर अध्यक्ष एड. संतोष म्हस्के यांनी मार्गदर्शन केले.एड.म्हस्के यांनी सावित्रीबाई फुले आणि फातीमाबी शेख यांच्या योगदानाची माहिती दिली.
डॉ पी ए इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त आठवडाभर मोफत आरोग्य तपासणी,ब्लॅंकेट वाटप,रक्तदान शिबीर,लहान मुलांच्या खेळ स्पर्धा,मनपाच्या योजनांबाबत जनजागृती असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते.
मुस्लिम को ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणूकीत यशस्वी झालेले संचालक एस.ए.इनामदार,बबलू सय्यद,अफझल खान,समीर शेख यांचा सत्कार करण्यात आला.असलम इसाक बागवान,अब्दुल रहमान बागवान,सादिक पानसरे यांनी संयोजन केले.कोंढवा परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते