पुणे, दि.०४ :- पुणे शहर पोलिस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांना केंद्रात महानिरीक्षकपदी ( आयजी ) आणि सहसचिवपदी पदोन्नती देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मान्यता दिली आहे .भारतीय पोलिस सेवेत असणार्या खुप कमी अधिकार्यांना हा बहुमान मिळतो. डॉ. रवींद्र शिसवे यांची भविष्यात केंद्र शासनाच्या अखत्यारितील आई.जी. तथा आई.जी. समकक्ष पदावर (केंद्रातील सह सचिव) नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय पोलीस सेवेतील 23 जणांना यंदा बहुमान मिळाला आहे. त्यात डॉ. शिसवे हे महाराष्ट्रातील एकमेव अधिकारी आहेत. दि ०३ (सोमवार) केंद्र सरकारमधील अंडर सेक्रेटरी अनजान सरकार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.ठाणे जिल्ह्यातील कल्याणजवळच्या आपटी गावचे मूळ रहिवासी बेळगावमधून एमबीबीएस केल्यानंतर तालुक्यातील आहेत . शहापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य डोळखांब अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली . त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेचा त्यांनी अभ्यास सुरू केला . २००२ मध्ये आयपीएस वेंचमध्ये निवड झालेले ते महाराष्ट्रातील एकमेव अधिकारी होते . प्रशिक्षणार्थी म्हणून सांगलीमध्ये अशोक कामठे यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले .
डॉ. रवींद्र शिसवे यांची 2019 मध्ये मुंबई येथून पुणे शहर सह पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली होती. काल त्यांना पदोन्नती मिळाली आहे. याबाबत ‘ ‘हा बहुमान मिळाल्याने आनंद झाला आहे. आगामी काळात देखील निती मुल्यांचे जतन करून समाजाची प्रमाणिकपणे सेवा आपण करत राहणार आहोत.’
पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे पुढे म्हणाले, पुणे शहरातमध्ये काम करताना अनेक वेगवेगळे अनुभव येत आहेत. खासकरून कोरोनाच्या संकट काळात काम करत असताना अनेक संघटना, संस्था यांच्या बैठका घेऊन अनेक नागरिकांना जोडता आले. कोरोना संकटाची परिस्थिती हाताळत असताना पुणेकरांनी मोलाचं सहकार्य केले असून मी त्यांचा कायमचा ऋणी राहील. दरम्यान, डॉ. शिसवे यांनी कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल अनेक संस्थांकडून त्यांचा गौरव देखील करण्यात आलेला आहे. आगामी काळात देखील प्रमाणिकपणे समाजाची सेवा करत राहण्याचा त्यांचा मानस आहे.पुण्यात काम करत असताना मला जानेवारी 2021 मध्ये ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ मिळालं, याचा मला खूप आनंद आहे.सह पोलीस आयुक्त पदावर काम करत असताना माझ्या सोबत काम करणाऱ्या सर्व कनिष्ठ कर्मचाऱ्यापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंतच्या सर्वांनी सहकार्य केले.पुण्यात कार्यरत असतानाच हा बहुमान मिळाल्याने खुप आनंद झाला आहे.ज्यावेळी माझी केंद्रातील पदावर नियुक्ती होईल त्या ठिकाणी देखील निती मुल्यांचे जतन करत प्रामाणिकपणे काम करेल असा विश्वास डॉ. रविंद्र शिसवे यांनी व्यक्त केला.पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे हे 2019 मध्ये पुण्यात सह पोलीस आयुक्त म्हणून रुजू झाले होते.
पुण्यात नियुक्त होण्यापूर्वी ते बृहन्मुंबई येथील संरक्षण व सुरक्षा विभागात व
त्यापूर्वी मध्य मुंबईत अपर पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते.
ते पदोन्नतीने पुण्यात बदली होऊन आले होते. यापूर्वी त्यांनी गडचिरोली, गोंदिया, सिंधुदुर्ग, बुलढाणा
आणि सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे.
मुंबईच्या प्रतिष्ठेच्या दक्षिण मुंबई म्हणजेच चे पोलीस उपायुक्त म्हणून सर्वाधिक काळ म्हणजे सुमारे चार वर्षे ते कार्यरत होते.पुण्याचे तत्कालीन सह आयुक्त शिवाजी बोडके हे सेवानिवृत्त झाल्यानंतर डॉ. रविंद्र शिसवे यांची नियुक्ती करण्यात आली होती.