पुणे,दि.०४ :- मा. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त लतादीदींच्या अजरामर गाण्यांना स्वरांजली वाहणारा ‘मेरी आवाज ही पहचान है।” हा स्वरमधुर कार्यक्रम विनामूल्यसादर दि ०६ मार्च रविवार रोजी दुपारी ३ वाजता पंडित भीमसेन जोशी कला मंदिर नाट्यगृह औंध पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.पंडित भीमसेन जोशी कला मंदिर नाट्यगृह औंध येथे गाण्यांचा कार्यक्रम रंगणार आहे. तसेच या कार्यक्रम भारतरत्न लता मंगेशकर यांना याप्रसंगी या कार्यक्रमातून भावपूर्ण आदरांजली वाहिली जाणार आहे. अनेक दशकं संगीताच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आनंदघन ‘लतादीदी’ काळाच्या पडद्याआड जरी गेल्या असल्या, तरीही आपल्या अद्भुत स्वरांनी हजारो गाण्यांना परीसस्पर्श करणाऱ्या लतादीदींचा आवाज मात्र आपल्याला सदैव साथ देत राहणार आहे.या कार्यक्रमासाठी सादरकर्ते असणार आहेत, ज्यांच्या सुमधुर आवाजामुळे लतादीदींच्या सुरांची आठवण येते अशा ‘प्रतिलता’ म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या ‘मित्सु बर्धन’ आणि त्यांना साथ द्यायला आपल्या सुंदर गायनशैलीने सर्वाना मंत्रमुग्ध करणारे ‘प्रतिकिशोर’ जितेंद्र भुरूक.चला तर मग, या स्वरांनी सजलेल्या या सुंदर कार्यक्रमाद्वारे आपण लतादीदींच्या सुंदर आठवणींना उजाळा देऊया! आपल्या कार्याला सलाम करणाऱ्या या खास कार्यक्रमाला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. मोफत प्रवेशिकेसाठी आम्हाला 8308 123 555 या क्रमांकावर अथवा www.sunnynimhan.com वर अवश्य संपर्क साधावा.