पुणे,दि.०६ :- एमपीडीए कायद्यांतर्गत पुण्यातील गजानन मारणे यांची नागपूर कारागृहात रवानगी करण्यात आली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी गजानन मारणे याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली होती. त्याची मुदत आज संपल्याने गजानन मारणे याची नागपूर कारागृहातून सुटका करण्यात आल्याची माहिती अॅड.विजयसिंह ठोंबरे यांनी दिली. गजानन मारणे याला सुरुवातीला येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यानंतर त्याची रवानगी नागपूर कारागृहात करण्यात आली होती.
गजानन मारणेची दोन खून खटल्यातून मुक्तता झाल्यानंतर त्याच्यावर आणखी खटले नसल्याने त्याची तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. कारागृहातून बाहेर येतात गजानन मारणे टोळीने बेकायदा जमाव जमवून फटाके वाजवले. तसेच आरडाओरडा करुन दहशत निर्माण केली. हा प्रकार मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाका येथे घडला. याप्रकरणी मारणेसह त्याच्या साथीदारांवर पुणे , पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिसांत वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते.
गजानन मारणे व त्याच्या समर्थकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. गजानन मारणे याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली होती. त्याची मुदत आज संपल्याने गजानन मारणे याची नागपूर कारागृहातून सुटका करण्यात आली आहे