पुणे,दि.२३ :- गजानन मारणे त्याचा मुलगा प्रथमेश मारणे याच्याविरोधात सिंहगड पोलीस स्टेशन येथे बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. एका 22 वर्षीय तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे ओळख वाढवून मैत्री केली आणि नंतर शारीरिक संबंध ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच अश्लील व्हिडिओ काढून तिला धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार 2020 ते 2022 या कालावधीत घडला.याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादीची इतर मित्राच्या माध्यमातून आरोपीची ओळख झाली होती. ओळख झाल्यानंतर प्रथमेश याने या मुलीला खडकवासला धरण परिसरात फिरायला नेले. तेथून परत येत असताना एका हॉटेलवर घेऊन जात तिच्या सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर वेगवेगळ्या हॉटेलमध्ये घेऊन जात तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. या सर्व प्रकरणाचे चोरून अश्लील व्हिडिओ काढले.दरम्यान हे व्हिडिओ फिर्यादीने डिलीट करण्याबाबत विचारल्यावर त्याने टाळाटाळ केली आणि फिर्यादीलाच धमक्या दिल्या. यानंतर या तरुणीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सिंहगड पोलीस करत आहे.