निरा नरसिंहपूर, दि.२७ :-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेमध्ये रेश्मा सरगर उत्तीर्ण झाल्यामुळे पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील देवराव सोपान पडळकर यांच्या परिवाराच्या वतीने
कचरेवाडी तालुका माळशिरस येथील. कुमारी रेश्मा बाळासाहेब सरगर यांचा सन्मान पिंपरी बुद्रुक गावचे विद्यमान सरपंच ज्योती श्रीकांत बोडके यांच्या हस्ते शाल श्रीफळ हार फेटा बांधून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती माजी सरपंच श्रीकांत बोडके, विद्यमान सरपंच ज्योती बोडके, लक्ष्मण वाघमोडे, सुभास मासाळ, बाळासो सरगर, ब्रह्मदेव नरुटे, देवराव पडळकर, हनुमंत पडळकर, कमाल पडळकर, श्रीमंत पडळकर, श्यामराव पडळकर, पप्पू पडळकर, महादेव पडळकर, व सर्व पडळकर वस्ती परिवार यावेळी उपस्थित होते.
निरा प्रतिनिधी :-बाळासाहेब सुतार