पुणे,दि.३१:- पुणे शहरातील धानोरी येथे पुणे महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण कारवाई करताना जमावाने पालिका अधिकाऱ्यांना मारहाण केली. यावर आक्रमक झालेल्या प्रशासनाने बुधवारी ही मोहीम तीव्र करत जागा बळकावणाऱ्यांना मोठ्या फौजफाट्यासह जबर दणका दिला.यावेळी अधिकारी व कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून झालेल्या मारहाणीचा निषेध केला. धानोरी ते पोरवाल रस्त्यावर ही कारवाई सायंकाळपर्यत सुरू होती. धानोरी-लक्ष्मीनगर येथून बुधवारी सकाळी कारवाई सुरू झाली. काही इमारतींच्या फ्रंट आणि साइड मार्जिनवर कारवाई करण्यात आली. इमारतीला लागुन असलेले तसेच
मोकळ्याजागीचे पत्रा शेडवर जेसीबीने पाडण्यात आले.फौजफाटा आणि प्रशासनाचा ‘मूड’ पाहून कारवाईला कोणीही विरोध केला नाही. ही कारवाई महापालिका उपायुक्त माधव जगताप, परिमंडल- १ चे उपायुक्त संजय गावडे, सहायक आयुक्त वैभव कडलख, सुहास जगताप, विभागीय निरीक्षक डी. एस. ढोकळे मुख्य खाते कनिष्ठ अभियंता – १० विभागीय अतिक्रमन अधिकारी -०२ येरवडा क्षेत्रीय कार्यालय कनिष्ठ अभियंता -०४ आरोग्य निरीक्षक -०४ बंधकाम विभाग उप अभियंता -०२ बांधकाम कनिष्ठ अभियंता -०५ बाधकाम असिस्टेंट-०४ टूलिप इंजीनियर-०३ परिमंडल क्रा १ ते ५चे कनिष्ठ अभियंता -०५ परिमंडल क्रा १ ते ५ चे क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक – ०५ अतिक्रम निरीक्षक -१४ परवाना व अकाशचिन्ह विभाग -३ पोलिस एसीपी १ पिआय २ एपिआय १ पिएसआय १ व इतर कर्मचारी सहा अति निरीक्षक -३७ कायम सेवक बिगारी -३८ ठेकेदार बिगारी – १५४ सुरक्षा रक्षक -३९ ट्रक/पिंजरा -२८
जे सी बी – ०८ Gas कटर ०२ ब्रेकर – ०२ या प्रमुख उपस्थितीत पार पडली. बिगारी, महापालिकेचे पोलीस कर्मचारी, अतिक्रमण नियंत्रण विभाग तसेच विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी असा फौजफाटा कारवाईवेळी तैनात होता.