मुंबई,दि.२५:- मोटारसायकल वर प्रवास करीत असताना हेल्मेट घालने आता मुंबईतही बंधनकारक करण्यात येणार आहे.येत्या पंधरा दिवसात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी होणार अशी माहिती मिळाली आहे. मोटार सायकल चालवताना हेल्मेट न वापरल्यास पाचशे रूपये दंड आणि तीन महिन्यासाठी गाडी चालवण्याचा परवाना रद्द करण्यात येईल. तसेच बाईक चालकासह मागे बसणाऱ्याला हेल्मेट बंधनकारक असेल. त्यामुळे मुंबईकरांना पंधरा दिवसांनी घराबाहेर पडताना हेल्मेट घालावे लागणार आहे. हेल्मेट वापरणं बंधनकारण असणार
मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी एक आदेश काढला आहे. मुंबईत जे दुचाकीवरून प्रवास करणारे जे प्रवासी आहेत. म्हणजेच चालक आणि मागे बसणाऱ्या व्यक्तीला देखील हेल्मेट वापरणं बंधनकारण असणार आहे. पुढच्या पंधरा दिवसात या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. जे नियम चालणार पाळणार नाहीत. त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे तीन महिन्यांसाठी चालकाचा वाहन परवाना रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे पंधरा दिवसांनी मुंबईकरांना हेल्मेट घालून घराबाहेर पडावे लागणार आहे.