पुणे,दि.२४ :- गोव्यातून पुण्यात येणारी एक लक्झरी बसमधून बेकायदेशीरपणे विदेशी दारु व बिअरची तस्करी करुन पुण्यात आणलेला माल राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडला आहे याप्रकरणी लक्झरी बस, तीन चाकी रिक्षासह 80 लाख रुपयांचा माल जप्त केला असून चौघांना अटक करण्यात आली आहे.
मंगेश पोपट मोरे, अक्षय बाळासाहेब हुलगे, पंकज देवनारायण निसाद व रवींद्र अशोक घारगे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
गोव्यातून एका लक्झरी बसमधून भारतीय बनावटीचे विदेशी मद्य येणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार गुरुवारी पुण्यात आंबेगाव येथील स्वामी नारायण मंदिरासमोर एका लक्झरी बसमधून विदेशी मद्य व बिअरचा साठा उतरवून तो तीनचाकी रिक्षामध्ये भरला जात होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही बस व रिक्षा जप्त केली आहे. ज्या ठिकाणी ही साठा ठेवण्यात येणार होता त्या कात्रज येथील अंजनीनगर येथील रवींद्र घारगे यांच्या घरावर छापा टाकला. तेथे 3 लाख 93 हजार 720 रुपयांचा माल आढळून आला. त्यामध्ये विदेशी मद्याचे व बिअरचे एकूण 45 बॉक्स तसेच लक्झरी बस व तीन चाकी रिक्षा असा एकूण 80 लाख 8 हजार 60 रुपयांचा माल जप्त केला आहे.
ही कारवाई निरीक्षक आर पी शेवाळे, एस एल पाटील, टी बी शिंदे,दुय्यम निरीक्षक चंद्रकांत रासकर, राजेंद्र झोळ, संजय राणे, प्रशांत दळवी, राम सुपेकर, अमित वालेकर, योगेंद्र लोळे,
संकेत वामन, कर्मचारी राजेश पाटील, शरद भोर, समीर पडवळ, राजू पोटे, महेश बनसोडे, रणजित चव्हाण,
दत्ता पिलावरे, नवनाथ पडवळ, वासुदेव परते, उज्वला भाबड यांच्या पथकाने केली.