पिंपरी चिंचवड,दि.१९ :- मराठगा क्रांती चौक, तळेगाव दाभाडे येथील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये चोरी केल्यानंतर. एटीएम जाळण्याची घटना घडली.पोलिसांनी २४ तासात 6 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एटीएम चोरीचे अन्य 2 गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच, 5.5 लाख रुपयांची रोख रक्कम व चारचाकी वाहन देखील हस्तगत केले आहे.
एचडीएफसी बँकच्या एटीएम मध्ये चोरी केल्यानंतर एटीएम जाळण्याची घटना घडली आहे. 24 तासाच्या आत एटीएम फोडणारया टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालायच्या दरोडा विरोधी पथक व गुन्हे शाखा युनिट 5 ने संयुक्त कारवाईत ही कामगिरी केली आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
ते पुढे म्हणाले की 6 आरोपींना अटक करण्यात आले आहे. त्यांच्याकडून एटीएम चोरीचे 2 गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांच्याकडून 5.5 लाख रुपयांची रोख रक्कम व चार चाकी वाहन हस्तगत करण्यात आले आहे. किरण महादे, वय 27 वर्षे, रा. संगमवाडी, खडकी, योगेश वाळुंज, वय 29 वर्षे, आळंदी, बाबासाहेब वाळुंज, वय 31 वर्षे, रा. तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर, मुंजाजी चंदेल, वय 32 वर्षे, मेदनकरवाडी बालाजीबागर, चाकण, अशोक पोतदार, वय 35 वर्षे, रा. परंडा कॉलनी, दिघी, बागवान थोरात, वय 21 वर्षे, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी या 6 आरोपींना अटक करण्यात आले आहे.
14 जुलैला मराठगा क्रांती चौक, तळेगाव दाभाडे येथील एचडीएफसी बँकेच्या एटीएम मशीनचा पासवर्ड प्राप्त करून अज्ञात चोरट्याने 5.82 लाख रोख रक्कम चोरी केली होती. (HDFC ATM Theft) तसेच दिशाभूल करण्याच्या हेतूने एटीएम मशीन ज्वलनशील पदार्थाचा वापर करून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात भा. द. वि. कलम 457, 380, 427, 436, 201, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरोडा विरोधी पथक व गुन्हे शाखा युनिट 5 समांतर तपास करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांनी पथकासह गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट दिली व सविस्तर माहिती घेतली. त्याप्रमाणे दोन्ही पथकास मार्गदर्शन व सूचना दिल्या. (HDFC ATM Theft) त्यांच्या आदेशाप्रमाणे पथकाने ए टी एम मशीन मध्ये पैसे भरणारी कंपनी सिक्युअर व्ह्याल्यु इंडिया लि. यातील पैसे भरणारा किरण महादे व पैसे भरणाऱ्या गाडीचा ड्राइवर योगेश वाळुंज यांच्याकडे केलेल्या चौकशीत तफावत आढल्याने त्यांच्यावरील संशय बळावला. त्या दोघांना दरोडा विरोधी पथक कार्यालयात आणून चौकशी केल्यावर त्यांनी कबूल केले की हा गुन्हा त्यांनी त्यांच्या साथीदारांसह केला होता.
त्यामुळे आरोपी बाबासाहेब वाळुंज, मुंजाजी चंदेल व भगवान थोरात यांना चाकण, पारनेर, आळंदी इत्यादी ठिकाणांवरून ताब्यात घेतले व एकत्रित चौकशी करण्यात आली. यामध्ये त्यांनी कबुली दिली की त्यांचे इतर दोन आरोपी साथीदार यांच्यासह हा गुन्हा केला होता. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या रकमेपैकी 2 लाख रोख रक्कम व गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली 3.5 लाख रुपये किंमतीची कार जप्त करण्यात आली आहे.योगेश वाळुंज व बाळासाहेब वाळुंज यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी कबूल केले की, एक वर्षांपूर्वी आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांनी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी त्यांच्यावर आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ही कारवाई आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त डॉ संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे)डॉ काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 1 पद्माकर घनवट, साहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्देश्वर कैलासे, पोलीस अप निरीक्षक मंगेश भांगे व त्यांच्या टीम ने तसेच गुन्हे युनिट 5 च्या टीमने ही कारवाई केली आहे.