पुणे,दि.१२:- काल आलेल्या मुसळधार पावसाने पुणेकरांची चांगलीच फजिती केली. हा पाऊस इतका भयंकर होता की त्यामुळे अक्षरशः पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं होतं, सगळ्या व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला होता.पुण्यातल्या पाषाण, सोमेश्वर वाडी यासह शहर परिसरात सायंकाळी साडेचारनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे चंदननगर, कोथरुड, वनाज कचरा डेपो, पाषाण, वानवडी, कात्रज उद्यान या भागांसह अनेक
ठिकाणी पाणी साचलं होतं. यामध्ये काही ठिकाणी गाड्या अडकून पडल्या असून दुचाकी वाहून गेल्या आहेत. जवळपास पाच तास पडलेल्या या पावसाचं पाणी काही घरांमध्येही शिरल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान, मा.नगर सेवक सनी विनायक निम्हण यांनी सोमेश्वर वाडी रोड ला जाणाऱ्या सनी स्पोर्ट क्लब शेजारील नाल्या साचलेल्या पाण्याला जेसीपीच्या साह्याने अडकलेला कचरा काडुन वाट करून द्यायचा प्रयत्न केला आहे. या निम्हण यांनी स्वतः लक्ष घालून कार्यकर्ते व जेसीपीच्या साह्याने चेंबरमध्ये अडकलेला कचरा काढला आणि या साचलेल्या पाण्याला वाट करून द्यायचा प्रयत्न केला आहे. ‘झुंजार’च्या प्रतिनिधीने याविषयीची माहिती दिली आहे. सोशल मीडियावर काही जणांनी मा.नगर सेवक सनी विनायक निम्हण या कौतुक केलं असून काही जणांनी महानगरपालिकेच्या निष्क्रियतेवर नाराजी व्यक्त केली आहे.