बारामती दि.१० :- आगामी लोकसभा निवङणूकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदार संघातील बारामती येथील प्राथमिक शाळा,जळोची येथील मतदान केंन्द्राची पाहणी आज जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी केली.यावेळी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी हेमंत निकम,तहसिलदार हनुमंत पाटील तसेच महसूल,पोलीस,सा.बां.विभाग तसेच ईतर विभागांचे आधिकारी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेताना दुष्काळ निवारण निधी वाटप,पुणे महसूल विभागांतील पहिल्या ई-पीक पाहणी अँपद्वारे करण्यात येणाऱ्या पथदर्शी प्रकल्पाबाबत,पंतप्रधान किसान सन्मान निधी इ.विषयांबाबत करण्यात येणारी कार्यवाहीची माहीती घेऊन आवश्यक सूचना केल्या.तसेच मतदान प्रक्रीयेमध्ये जास्तीत जास्त नागरीकांचा सहभाग वाढवावा.मतदान केंद्रे सर्व सुविधापूर्ण असावीत आदी सूचना करून निवङणूकीच्या नियोजना संदर्भात उपस्थित अधिकार्यांकङून आढावा घेतला.तसेच प्रशासनाकङून करण्यात येत असलेल्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. यानंतर जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी कण्हेरी वन क्षेत्रास भेट दिली.सामाजिक वन विभागामार्फत १३ कोटी वृक्ष लागवङ आभियानांमध्ये बारामती वन क्षेत्रातील कण्हेरी वन क्षेत्रांत जून २०१८ मध्ये ८ हेक्टर क्षेत्रामध्ये एकूण ५००० वृक्षांची लागवङ करण्यात आली होती. पाण्याच्या योग्य नियोजनामुळे कङूलिंब,बाभळ,चिंच व ईतर जातींची जवळपास ९० % पेक्षा जास्त रोपे जिवंत राहीली असल्याने जिल्हाधिकार्यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी,परिक्षेत्र अधिकारी राहूल काळे,नियतक्षेत्र वनअधिकारी तानाजी पिचङ तसेच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.