पुणे,दि.१९ :- यंदाच्या दिवाळीनिमित्त गुरुवार 20 व शुक्रवार 21 ऑक्टोबर 2022 रोजी दोन दिवसीय ‘कोथरुड सुरोत्सव’ उत्सव सुरांचा दिवाळी पाहट कार्यक्रम नॉर्थ डहाणूकर मैदान, कोथरूड बस स्टँडमागे, कोथरूड पुणे येथे आयोजित केला आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत सौ.हर्षाली दिनेश माथवड (मा, नगरसेविका, पुणे मनपा) आणि सामाजिक कार्यकर्ते दिनेश माथवड यांनी दिली.
दिनेश माथवड म्हणाले की, दर वर्षीप्रमाणे यंदा कोथरुडवासीयांसाठी दिवाळी निमित्त दिवाळीची पहाट सुरमयी करण्यासाठी सुरांची रेलचेल घेवून आलो आहे. यंदाच्या दिवाळीनिमित्त गुरुवार 20 ऑक्टोबर रोजी पहाटे 05:30 वाजता सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे व सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका अमृता नातू आपल्या शास्त्रीय गायनाने मंत्रमुग्ध करणार आहेत आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा थिगळे करणार आहेत.
तसेच 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता संपन्न होणार्या सुरांच्या मैफिलीत सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे आपल्या आवाजाने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीरा जोशी करणार आहेत.सदरील सुरोत्सवाचा कार्यक्रम नॉर्थ डहाणूकर मैदान, नटराज गॅस एजन्सीजवळ, कोथरूड बस स्टँडमागे, कोथरूड गावठाण पुणे येथे संपन्न होणार असून सर्वांनी या सुरेल मैफिलीचा आनंद मोफत उपलब्ध आहे.
तसेच पुणे जिल्हा पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आमदार चंद्रकांत पाटील आणि भाजपा महाराष्ट्र सरचिटणीस पदी मुरलीधर मोहोळ यांची निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन सौ.हर्षाली दिनेश माथवड (मा, नगरसेविका, पुणे मनपा) आणि सामाजिक कार्यकर्ते दिनेश माथवड यांनी केले असून कार्यक्रमाचे नियोजन डी के ऐंटरटेन्मेटस् यांनी पाहिले.
त्याचे प्रमाणे कोथरुडमधील नागरिकांची दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने दरवर्षी प्रमाणे यंदाही दिवाळी फराळाचे वाटप करण्यात येणार आहे. गेल्या पाच वर्षापासून दिवाळी फराळाचे वाटप केले जात आहे. यंदा 23 ऑक्टोबर रोजी सांयकाळी विशेष कार्यक्रमात कोथरुड भागात काम करणार्या पुणे मनपाच्या कर्मचार्यांना तसेच रस्त्यावरील गोरगरिबांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात येणार आहे.