पुणे,दि.२१:- चतुःश्रृंगी पोलिसांनी सोन्याचे दागिणे व चांदीच्या वस्तु जबरी चोरी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद केली आहे. त्यांच्या ताब्यातून सुमारे ५ लाख ७४ हजार १११ रुपये किमतीचे मुददेमाल हस्तगत करण्यात आले आहेत. टोळीतील ७ आरोपींना अटक करुन ९ गुन्हे उघडकीस आणले आहेत. चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, तपास पथकाचे पोलीस अंमलदार, प्रकाश आव्हाड, ज्ञानेश्वर मुळे, तेजस चोपडे, श्रीकांत वाघुले, बाबा दांगडे यांनी पहाटे सलग दोन आठवडे पाळत ठेवुन रात्रीच्या वेळी सापळा लाऊन आरोपी हे घरफोडी करुन जात असताना सात आरोपींना रंगेहात पकडले असुन घरफोडी करणारी आंतरराज्य
टोळी तिल गुन्हेगार हाती लागले आहेत. आरोपी हे घरफोडी करुन जात असताना सात आरोपींना रंगेहात पकडले असुन सदर आरोपी यांची नावे १) राकेश इंदु मच्छा (मंडकोई), वय-२१ वर्ष, रा- गाव. तरसिंगा, पोस्ट – नरवाली, ता.कुक्षी, जि.धार, राज्य मध्य प्रदेश २ ) सुरेश गुमानसिंग मावी, वय-२०वर्ष, रा गाव, पिपरानी, पोस्ट – नरवाली, ता.कुक्षी, जि.धार, राज्य-मध्य प्रदेश ३) प्यारसिंग भुल्ला आलवा, वय २० वर्ष, रा. गाव पिपरानी, पोस्ट-नरवाली, ता.कुक्षी, जि.धार, राज्य-मध्य प्रदेश ४ ) बियानसिंग ऊर्फ भाया ठाकुर सिंग भुढड, वय-२० वर्ष, रा. गाव, खनिआंबा, पोस्ट नरवाली, ता.कुक्षी, जि.धार, राज्य मध्यप्रदेश ५) महेंद्रसिंग कलमासिंग डावर, वय-२० वर्ष, रा. गाव नरवाली, पोस्ट, टांण्डा, ता.कुक्षी. जि. धार, राज्य मध्यप्रदेश, ६) महींदर थानसिंग अजनार, वय २० वर्ष, रा. गाव पिपराणी, पोस्ट. टांण्डा, ता.कुक्षी, जि.धार, राज्य मध्य प्रदेश ७) कल्लु मकुन देवका, वय २३ वर्ष, रा. गाव, खनिआंबा, पोस्ट नरवाली, ता.कुक्षी, जि.धार, राज्य मध्यप्रदेश अशी अटक आरोपींची नावे आहेत.
सदर आरोपी यांचेकडे पोलीसांना अधिक तपास केला असता त्यांनी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन परिसरात गुन्हे केल्याचे तपासात निषंन्न झाले आहे एकुण ०९ गुन्हे उघडकीस आणुन त्यामध्ये घरफोडीचे साहित्य, सोन्याचे दागिणे व चांदीच्या वस्तु असा एकुण ५,७४,११०/- रुपये किंचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला असुन सदर गुन्हयातील दोन रिसीव्हर हे अदयाप पर्यंत मिळाले नसुन त्यांचा शोध चालु आहे. तसेच सदर आरोपीकडुन पुणे शहरातील इतर पो स्टे चे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असुन गुन्हयाचा तपास सुरु आहे.सदर आरोपी हे मध्य प्रदेश राज्यातील सराईत गुन्हेगार असुन ते विकेंडला नदी पात्रालगत असलेल्या सोसायटी मध्ये घरफोडी करण्यासाठी नदीपात्रात येवुन थांबत असत व मच्छर चावु नये म्हणुन अंगाला लोशन व चिखल लावुन थांबत होते. त्यानंतर आरोपी हे रात्री शांतता झाल्यानंतर सोसायटीच्या पाठी मागील कंपाऊडचे मागील बाजुस तारा कट करुन त्यामधुन प्रवेश करुन सदर सोसायटी मध्ये प्रवेश करुन घरफोडी करीत होते. चोरी
झाल्यानंतर आरोपी हे वाहनाचा वापर न करता ते पायी चालत जावुन लॉजवर न राहता टेकडया व फुटपाथवर आश्रय घेत होते. नमुद आरोपी हे सध्या पोलीस कस्टडीत असुन पुढील तपास सुरु आहे. सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णीक, अपर पोलीस आयुक्त, नामदेव चव्हाण, पोलीस उप-आयुक्त, परी-४, पुणे शहर, रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे यांचे मार्गदशनाखाली चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राजकुमार वाघचवरे, पोलीस निरीक्षक, गुन्हे, अंकुश चिंतामण, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक, निलेशकुमार महाडीक, पोलीस उप-निरीक्षक, रुपेश चाळके, पोलीस उप-निरीक्षक महेश भोसले, रुपेश टिमगिरे तपास पथकातील पोलीस अंमलदार दिनेश गडांकुश, श्रीकांत वाघवले, इरफान मोमीन, प्रकाश आव्हाड, ज्ञानेश्वर मुळे, बाबुलाल तांदळे, बाबा दांगडे, कुणाल माने, सुधीर माने, किशोर दुशिंग, आशिष निमसे, तेजस चोपडे, सुहास पोतदार, सचिन कांबळे यांनी केली आहे.