• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, May 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पिंपळेगुरव, नवी सांगवीतील अर्धवट व प्रलंबित विकासकामांना गती द्या; शंकर जगताप यांनी अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
04/11/2022
in राजकीय
Reading Time: 1 min read
0

पिंपरी, दि. ०४ (प्रतिनिधी) – भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी पिंपळेगुरव आणि नवी सांगवी भागातील अर्धवट आणि विविध प्रलंबित विकासकामांचा शुक्रवारी दि.४ रोजी आढावा घेतला. यासंदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून विकासकामांना गती देण्याची मागणी केली. स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेली काही कामेही अर्धवट स्थितीत असल्याचेही शंकर जगताप यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

नगरसेवकांच्या कार्यकाळात पिंपळेगुरव आणि नवी सांगवीतील अनेक विकासकामांना सुरूवात करण्यात आली होती. परंतु, महापालिकेवर प्रशासक राज सुरू झाल्यानंतर या विकासकामांना थोडा ब्रेक लावण्यात आला आहे. बहुतांश कामे संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. विकासकामांना गती मिळावी या उद्देशाने भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र राजापुरे, माजी नगरसेवक सागर आंघोळकर, अंबरनाथ कांबळे यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून पिंपळेगुरव आणि नवी सांगवीतील सर्व कामांचा आढावा घेतला. अर्धवट स्थितीतील कामांबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

नवी सांगवीतील कृष्णा चौकाचे सुशोभिकरण, कृष्णा चौक ते एम. के. हॉटेलपर्यंत सांडपाणी वाहिन्यांचे काम, सांगवी फाटा ते सांगवी हा १२ मीटर रुंदीचा रस्ता पूर्ण करण्याची शंकर जगताप यांनी अधिकाऱ्यांकडे मागणी केली. तसेच पिंपळेगुरवमधील सुदर्शननगर चौकातील ८ टू ८० पार्कमधील खेळणी आणि व्यायामाचे साहित्य तुटल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्याचप्रमाणे स्मार्ट सिटीअंतर्गत पिंपळेगुरवमध्ये सुरू असलेली काही कामे अर्धवट स्थितीत असल्याचेही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

यावेळी महापालिकेचे सहशहर अभियंता मनोज सेठिया, कार्यकारी अभियंता अनिल शिंदे, उपअभियंता विजय कांबळे, राहुल पाटील, चंद्रकांत मोरे आदी उपस्थित होते.

Tags: नवी सांगवीपिंपळेगुरव
Previous Post

भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात महिला काँग्रेसचे आंदोलन,

Next Post

व्हॉट्सअप फोन करून वीज ग्राहकांची फसवणूक, १ लाख ११ हजार हडपले; चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

व्हॉट्सअप फोन करून वीज ग्राहकांची फसवणूक, १ लाख ११ हजार हडपले; चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In