पुणे,दि.२१:-पुणे शहरांतील चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली ईश्वर सूळ यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. तर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे. तसेच पोलीस उपनिरीक्षक शामल प्रकाश पोवार-पाटील यांची चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातून विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. बदली आणि निलंबनाचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सोमवारी (दि.२१) रोजी संध्याकाळी काढले आहेत.निलंबन काळात सूळ यांना कोणत्याही प्रकारची खजगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. याबाबतचे प्रमाणपत्र देऊन निर्वाह भत्त्याची रक्कम स्वीकारावी लागेल, असे आदेशात नमूद केले आहे.
चतु:श्रृंगी पोलीस निरीक्षकाची बदली
पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे.
राजकुमार वाघचवरे यांची विभागीय चौकशी प्रलंबीत असल्याने त्यांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे.
याशिवाय महिला पोलीस उपनिरीक्षक शामल प्रकाश पोवार-पाटील यांची चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातून विशेष शाखेत बदली केली आहे.