पुणे,दि.13 :- जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे-11, पुणेमहानगरपालिका (समाज विकास विभाग),शिवाजीनगर, पुणे आणि एस.एन.डी.टी. कॉलेज ऑफ होम सायन्स, महर्षि कर्वे विद्या विहार, कर्वे रोड, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनदयाळ अंत्योदय योजनाराष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत कौशल्यप्रशिक्षणद्वारे रोजगाराची उपलब्धता या घटक अंतर्गतरविवार, दि. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन एस.एन.डी.टी. कॉलेजऑफ होम सायन्स, महर्षि कर्वे विद्या विहार, कर्वे रोड,पुणे येथे करण्यात आलेले आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक संचालक अ. उ. पवार यांनी दिली आहे. या साठी पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, भोसरी, व पिंपरी-चिंचवड या औद्योगिक परिसरातील एकूण – 34 उद्येाजकांनी सहभाग दर्शविलेला असून,त्यांच्याकडून एकूण – 2213 रिक्तपदे कळविण्यातआलेली आहेत. उपरोक्त योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यकौशल्य विकास संस्था व राष्ट्रीय कौशल्य विकासमहामंडळ यांचेद्वारे विविध पातळीवर प्रशिक्षण देण्यातआलेले आहे. त्याअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या वप्रशिक्षण घेत असलेल्या जास्तीत जास्त लाभार्थीउमेदवारांना, तसेच समाजातील इतर पात्र उमेदवारांनादेखील या रोजगार मेळाव्यामध्ये रोजगार प्राप्त व्हावा,या उद्देशाने संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यास्तव किमान 10 वी, 12 वी पास व एमसीव्हीसी,पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा, बीई, बीबीए, एमबीए,ड्रायव्हर्स इ. पात्रता धारण केलेल्या तसेच सदरयोजनेंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी, रविवार,दि. १७ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या मेळाव्याअतंर्गतखाजगी क्षेत्रातील उपलब्ध असणा-या विविधप्रकारच्या जागांसाठी प्रत्यक्ष मुलाखतीस (Walk-in-Interview) आपल्या बायोडाटा (रिझ्युम) च्या प्रती वमूळ कागदपत्रांसह उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा. सहभाग घेणा-या सर्व उमेदवारांनीwww.mahaswayam.gov.in या वेबसाईटवरजाऊन उद्योजकांची मागणी पाहून आपली संमतीनोंदवावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे, पुणेमहानगरपालिका (समाज विकास विभाग),शिवाजीनगर, पुणे आणि एस.एन.डी.टी. कॉलेज ऑफहोम सायन्स, महर्षि कर्वे विद्या विहार, कर्वे रोड, पुणे या तीनही कार्यालयांनी केलेले आहे, असेही सहायक संचालक अ.उ.पवार यांनी कळविले आहे.