पुणे,दि.३१:- पुणे शहरातील वारजे कॅनाल रोड येथील अनधिकृत बांधकामावर बांधकाम विकास विभाग झोन 3 व अतिक्रमण विभाग पुणे महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण कारवाई मंगळवारी ही मोहीम तीव्र करत जागा बळकावणाऱ्यांना मोठ्या फौजफाट्यासह जबर दणका दिला.यावेळी अधिकारी व कर्मचारी यांनी वारजे कॅनाल रोड येथे ही कारवाई सायंकाळपर्यत सुरू होती. वारजे कॅनाल रोड येथे मंगळवारी सकाळी कारवाई सुरू झाली. काही इमारतींच्या फ्रंट आणि साइड मार्जिनवर कारवाई करण्यात आली. इमारतीला लागुन असलेले तसेच
मोकळ्याजागीचे पत्रा शेडवर जेसीबीने पाडण्यात आले.फौजफाटा आणि प्रशासनाचा ‘मूड’ पाहून कारवाईला कोणीही विरोध केला नाही. ही कारवाई महापालिका अधिक्षक अभियंता युवराज देशमुख, कार्यकारी अभियंता श्रीकांत वायदंडे, उपअभियंता निवृत्ती उथळे, तसेच वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त राजेश गुर्रम यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता सतीश शिंदे, सचिन जावळकर, अजित ववले, अतिक्रमण विभागाचे अधिकारी श्रीकृष्ण सोनार यांच्या पथकाने ही कारवाई केली – 30/11/2022 रोजी कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई मध्ये सुमारे 20000 sqft बांधकामावर कारवाई करण्यात आली. या कारवाई साठी तिन ट्रक व 2 जेसीबी, 1 गॅस कटर, 20 कर्मचारी 3 पोलीस, 4 सुरक्षा रक्षक उपस्थित पार पडली. बिगारी, महापालिकेचे पोलीस कर्मचारी, अतिक्रमण नियंत्रण विभाग तसेच पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी असा फौजफाटा कारवाईवेळी तैनात होता.