पुणे,दि.०५ :- पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात डिजे सिस्टिम लावून संगीत वाजवणाऱ्यावा.कोरा कॉकटेल बार अॅण्ड किचन हॉटेल‘’वर पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली आहे. पोलिसांनी हॉटेलमधून साऊंड सिस्टीम, डिजे मिक्सर जप्त केला आहे. ही कारवाई शनिवार (दि.०३) केली.सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक कोरेगाव पार्क परिसरातील कोरा कॉकटेल बार अॅण्ड किचन हॉटेल, येथे मोठ्या आवाजात सांउड सिस्टिमवर संगीत वाजवले जात असल्याची गोपनीय माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकाला मिळाली. व त्याठिकाणी छापा टाकला असता मोठ्या आवाजात संगीत सुरु असल्याचे आढळून आले. पोलिसांनी आरोपी हॉटेल चालक, हॉटेल मॅनेजर, व डिजे चालवणारे हे पुन्हा अशाच प्रकारे त्यांचे मालकीचे कोरा कॉकटेल बार अॅण्ड किचन हॉटेल मध्ये मोठयाने संगीत वाजवुन उपद्रव करीत असताना मिळुन आले. त्यांचे विरूध्द सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार राणे यांनी गुरनं १३५/२०२२ भादवि कलम २६८, २९० २९१ प्रमाणे फिर्याद दिली आहे.हॉटेलमधील दोन लाख च्याळीस हजार रुपये किमतीचे सांउड सिस्टिम जप्त केले आहे. पोलिसांनी हॉटेलवर पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत ध्वनी प्रदुषण अधिनियमानुसार कारवाई केली. जप्त केलेला मुद्देमाल कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आली आहेत.ही कारवाई .पोलीस आयुक्त, पुणे शहर, अमिताभ गुप्ता पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे, अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार तसेच सपोनि अश्विनी पाटील, सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, आण्णा माने, प्रमोद मोहिते, हणमंत कांबळे, इरफान पठाण, पुष्पेंद्र चव्हाण, अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली आहे.