पुणे,दि.१९ :- पुणे शहरात व इतर ठिकाणी वेश्या व्यावसायच्या माध्यमातून आपले आर्थिक बस्तान बसविणाऱ्या व संघटितपणे गुन्हेगारी करणाऱ्या कुख्यात कल्याणी देशपांडेसह दोघांना विशेष न्यायालयाने 7 वर्ष सक्तमजुरी आणि १० लाख ५ हजार पाचशे रुपयेचा दंड ठोठावला आहे.महत्वाचे म्हणजे पिटा आणि मोक्काच्या गुन्ह्यातील झालेली ही पहिलीच शिक्षा असल्याचे बोलले जात आहे. विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी या प्रकरणात युक्तीवाद करताना दोघांना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली होती. सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.पोलिसांनी ऑगस्ट २०१६ मध्ये अटक केली होती. तिच्याविरुद्ध पुण्यातील विविध पोलीस ठाण्यात वीस गुन्हे दाखल होते. तिला पुणे शहरातून तडीपारदेखील करण्यात आले होते.पुणे शहरात संघटीतपणे वेश्याव्यवसाय केल्याप्रकरणी तिच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. शहरातील चतु:श्रृंगी, कोथरूड, विश्रांतवाडी, हिंजवडी आदी पोलीस ठाण्यात तिच्यावर 20 पेक्षा अधिक गुन्हे दाखल होते. कल्याणीला ऑगस्ट २०१६ मध्ये अटक करण्यात आली असून ती सध्या येरवडा जेलमध्ये आहे.