पिंपरी चिंचवड,दि.१९ :- चाकण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पोक्सो गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी दहा हजार रुपये लाच घेताना चाकण पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई आणि खासगी व्यक्तीला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले आहे. पोलीस शिपाई संतोष सुरेश पंदरकर, खाजगी इसम किसन आंद्रे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पुणे एसीबीच्या पथकाने ही कारवाई सोमवारी (दि.19) केली.व 32 वर्षीय व्यक्तीने पुणे एसबीकडे तक्रार केली आहे. चाकण पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी पोलीस शिपाई संतोष पंदरकर यांनी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती.व तक्रारदार यांनी याबाबत पुणे एसीबीकडे 3 डिसेंबर रोजी तक्रार केली.पथकाने पडताळणी केली असता, पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पोस्को गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी पोलीस शिपाई पंदरकर यांनी दहा हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पथकाने सोमवारी सापळा रचून. तक्रारदार यांच्याकडून लाचेची दहा हजार रुपये रक्कम स्विकाराताना खासगी इसम किसन आंद्रे याला ताब्यात घेण्यात आले.यानंतर पोलीस शिपाई संतोष पंदरकर याला ताब्यात घेतले.
दोघांवर चाकण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास ला. प्र. वि. पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक, श्रीराम शिंदे तपास करत आहेत. सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. शासकीय अधिकारी, कर्मचारी / लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास दिलेल्या. हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४ अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे दुरध्वनी क्रमांक ०२०-२६१२२१३४, २६१३२८०२, २६०५०४२३ व्हॉट्स अॅप क्रमांक पुणे – ७८७५३३३३३३ व्हॉट्स अॅप क्रमांक मुंबई – ९९३०९९७७०० ई-मेल आयडी पुणे dyspacbpune@mahapolice.gov.in वेबसाईट – www.acbmaharashtra.gov.in
ऑनलाईन अॅप तक्रार www.acbmaharashtra.net.in क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी केले आहे.