पुणे,दि.२१:- सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक येथे मुख्य रस्त्याजवळ फुलपरी स्वीट मॉल हे दुकानात काजूकतली फुकट दिली नाही, या कारणावरुन दोघांनी मिठाईच्या दुकानदाला तुला गोळया घालीन” अशी धमकी दिली. दुकान मालकाने काजुकतली फुकट देण्यास नकार दिला असता, निळे रंगाची डार्क जिन पॅन्ट व रंगबिरंगी शर्ट घातलेला व डोक्यावर काळे रंगाची उलटी टोपी घातलेल्या आरोपीने त्याचेकडील पिस्तुल काढुन “फुकट काजू कतली दे नाहीतर गोळीच घालतो” असे म्हणुन दुकान मालकाचे दिशेने पिस्तुल रोखुन २ ते ३ वेळा फायरिंग करणेकरीता पिस्तुलचा ट्रेगर दाबला असता, पिस्तुल मधुन एकही गोळी फायर झाली नाही. त्यानंतर आरोपी हा दुकानातुन बाहेर निघुन जावुन, पुन्हा दुकानामध्ये येवुन “फुकट काजू कतली दे पैसे मिळणार नाही”असे म्हणुन फिर्यादीचे दिशेने पिस्तुल रोखुन फायरींग करण्याचा प्रयत्न केला असता, पिस्तुल मधुन त्यातून एक गोळी उडून खाली पडली. हा प्रकार पाहून दुकानात गर्दी झाली. तेव्हा ते दोघे पळून गेले.ही बाब व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सचिन निवंगुने यांना समजली.व त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांना याची माहिती दिली. व त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीची तपासणी केली. दुकानात पिस्तुलातून पडलेली गोळी पाहिली.तेव्हा ती खरी असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने सदर गुन्हयाचे अनुशंगाने तपासा मध्ये पोलीस उप निरिक्षक, स्वप्नील लोहार, पोलीस अंमलदार, अमित बोडरे, शिवाजी क्षिरसागर, सागर शेडगे यांनी त्यांना गोपनीय बातमी मिळाली व आरोपींना ०८ तासांच्या आत आरोपींचा शोध घेऊन,सिंहगड रोड पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुले जप्त केली आहेत. सुरज ब्रह्मदेव मुंडे (वय २३, रा. माणिकबाग, सिंहगड रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, रंजनकुमार शर्मा, पश्चिम प्रादेक्षिक विभाग,पोलीस उप- आयुक्त, परि-३,सहा. पोलीस आयुक्त,सुनिल पवार, सिंहगड रोड विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शैलेश संखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर, पोलीस उप निरिक्षक, स्वप्नील लोहार, पोलीस अंमलदार, अमित बोडरे, शिवाजी क्षिरसागर, सागर शेडगे, संजय शिंदे, विकास बांदल, राजु वेगरे, सुनिल चिखले, गौतम किरतकुडवे व गणेश झगडे यांनी केली आहे.