पुणे,दि.०७:- शिवाजीनगर गावठाणात दुचाकीवरुन आलेल्या टोळक्यांनी ४६८, रविंद्र अपार्टमेंट, जोशी आळी शिवाजीनगर गावठाण पुणे फिर्यादी यांचेशी झालेल्या जुन्या भांडणाचे कारणावरुन दहशत करून रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करुन परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.या प्रकरणी शिवाजीनगर गावठाणात राहणार्या एका ३८ वर्षाच्या महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ३/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आदित्य वडसकर (रा. शिवाजीनगर गावठाण), विशालसिंह व इतर ७ ते ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ५ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या
माहितीनुसार, फिर्यादी महिलेबरोबर आरोपी यांची पूर्वी भांडणे झाली होती. फिर्यादी व त्यांचे दाजी हे घरी.येत असताना फिर्यादी या बिल्डिंगमध्ये जात असताना रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अचानक त्यांच्या घराच्या बाजुला असणार्या रोडवरुन काही वाहने मोठमोठ्याने हॉर्न वाजवत आले.४ दुचाकीवरुन ८ ते १० जण आले होते.त्यांनी वाहने लावून फिर्यादी यांच्या घराच्या दिशेने कडेला पडलेले दगड विटा उचलून फेकले.त्यामुळे तेथील हॉस्टेलवर राहणारी मुले, मुली घाबरुन पळून लावली.व त्यानंतर या टोळक्याने घराचे गल्लीमध्ये पार्क केलेली होंडा सिटी कार, मोटारसायकल, रिक्षा यांच्यावरद गडफेक करुन त्यांच्या काचा व हुड फाडून नुकसान केले.व टोळक्याने जंगली महाराज मंदिराशेजारी असणार्या जे एम कॉर्नरमधील स्टॉलवर दगडफेक करुन दहशत निर्माण केली होती.पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक उत्तम माने तपास करीत आहे.