औरंगाबाद दि,१८ ःः- गतवर्षी उपविजेता राहिलेल्या हॉकी हरियाणा संघाने सलग दुसरा विजय साकारत अत्तापर्यंतच्या स्पर्धेत अजिंक्य राहण्याची किमया साधली आहे. हॉकी महाराष्ट्रला मात्र सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाची चव चाखावी लागली असुन, अटीतटीच्या लढतीत महाराष्ट्रा विरुद्ध गंगपूर ओडिशा संघाने विजय मिळवला.
सोमवारी (18 फेब्रुवारी) नवव्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत भारतीय खेळ प्राधिकरण टर्फ मैदानावर झालेल्या सामन्यात हॉकी हरियाणाने हॉकी झारखंडला 3-2 ने नमवत ब गटातील अव्वल स्थान कामय ठेवले. दुसरीकडे क गटात सगल दुसरा पराभव पत्करावा लागलेल्या महाराष्ट्र संघाला गुणांचे खाते उघडता आलेले नाही.
हॉकी हरियाणा, हॉकी झारखंड दरम्यानच्या सामन्यात अंकुशने (4 मि. 36 मि.) दोन गोल केले आणि हरियाणा संघाला आघाडी मिळवुन दिली. मध्यांतरापर्यंत 1-0 असलेली ही आघाडी कालांतराने 2-0 पर्यंत गेली. तिसऱ्या सत्रात मात्र हॉकी झारखंडने काहीसा पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना यश आले ज्यात अनुरुद भेंगरा (42 मि.) याने पेन्ल्टी कॉर्नरचा मोका साधला. त्यापुढे राजू होरोने 45 व्या मिनीटात पेनल्टी स्ट्रोकच्या माध्यमातुन गोलसंख्येत 2-2 ची फिट्टमफाट केली. परमितने 52 व्या मिनीटात गोल केला आणि सामना हॉकी हरियाणाच्या पारड्यात आणुन घातला.
मणिपुरचा 4-3 ने विजय
ब गटातील सामन्यांमध्ये पहिल्या दिलशी पराभव पत्कराव्या लागलेल्या मणिपुर संघाने दुसऱ्या दिवशी मात्र जोरदार पुनरागमन करत स्पर्धेतील पहिला सामना खेळणाऱ्या मुंबई हॉकी असोसिएशन लि. च्या विरोधात 4-3 ने विजय साकारला. हॉकी मणिपुर संघाने 3-0 च्या मेगा आघाडीने स्पर्धेची सुरुवात केली. निरजकुमार वारीबामने (19 मि., 47 मि.,) दोन तर त्याचा साथीदार असलेल्या रोहित इरेंगबाम (28 मि, 32 मि.) यांनी चार गोल करत मणिपुरसाठी विजयाचा भार उचलला. आघाडी कापुन काढण्यासाठी मुंबईच्या संघानेही जोरदार खेळ करत आपले कसब दाखवुन दिले. अनिल राठोड (38 मि.), मोहित कथोटे (43 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. त्यावर मोहितने 52 व्या मिनिटात गोल करत सामन्यात पुनरागमनाचा प्रयत्न केला, जो अयश्वी ठरला.
दिल्ली हॉकी, हॉकी गंगपूर- ओडिशाची आघाडी
क गटातील सामन्यात यजमान महाराष्ट्र संघाला सलग दुसरा पराभव चाखावा लागला. त्यांना गंगपूर ओडिशाने 2-1 च्या फरकाने नमवले. मध्यांतरापर्यंत व्यंकटेश केचे (28 मि.) च्या 1-0 ची असलेली आघाडी महाराष्ट्राला कायम ठेवता आली नाही. अमरदिप लाक्रा या ओडिशाच्या खेळाडूने 36 व्या मिनीटांत बरोबरी साधली आणि सामन्याला वेगळा रंग दिला. ग्रेगोरी झेसने (51 मि.) लगावलेल्या दमदार फटक्याने बाजी फिरली आणि सामना हॉकी गंगपूर ओडिसाच्या पारड्यात गेला.
स्पर्धेतील सामन्यात आपला पहला सामना बरोबरीत सोडवणाऱ्या दिल्ली हॉकी संघाने दुसऱ्याच दिवशी हॉकी कर्नाटकला 3-0 ने नमवुन सामन्यात निर्भेळ यश मिळवले. दिल्लीतर्फे भरतने दोन (44 आणि 51 मि.,) तर प्रशांतने एक (55 मि.) गोल केला.
हॉकी पंजाबचे पुनरागमन, तामिळनाडू गट अ मध्ये अव्व्ल
तामिळनाडू संघाशी खेळताना निकालाचा मोठा उलटफेर पहायला मिळणाऱ्या पंजाब संघाने दुसऱ्या दिवशीा मात्र 5-1 च्या फरकाने सर्व्हीसेस स्पोर्ट कंट्रोल बोर्ड (एसएससीबी) ला अ गटात नमवले. त्यात पंजाकडुन सिमरनज्योत सिंग (3 मि, 7 मि.,) ने दोन वेगवान गोल केल्याने हा सामना त्यांच्या दिशेने फिरला होता. त्यावर बाराव्या मिनीटात दिपकने एक गोल केला जो एसएससीबीसाठी एकमेव ठरला. हॉकी पंजाब दोन गोलवर न थांबता पुढे सरकला आणि त्यांच्यातर्फे विशालजित सिंग (49 मि.,) रमण कुमार (53 मि.,) आणि अंगदबीर सिंग (60 मि.,) यांनी ही आघाडी 5-1 पर्यंत पुढे नेली. एसएससीबीचा हा दुसरा पराभव आहे.
हॉकी तामिळनाडूने हिमाचल प्रदेशच्या विरोधातील सामन्यात 2-2 ने बरोबरी साधली आणि सामना चार गुणांच्या साथीने आ गटातील अव्व्ल स्थान पटकावले. एस कार्थीने 44 व्या तर एस. मरीश्वरनने 48 व्या मिनीटात तामिळनाडू संघासाठी गोल केले. हिमाचल संघासाठी चरणजित सिंग आणि अमित ने अनुक्रमे 57 आणि 59 व्या मिनीटांत गोल करत तामिळनाडूला विजय दुरापास्त केला. मात्र हिमाचल संघाने एक या सामन्यात पटकावला.
ड गटात पंजाब आणि सिंध बॅंक आणि भारतीय खेळ प्राधिकरण दरम्यानचा सामना 1-1 ने बरोबरीत सुटला. हरकवलबीर सिंग (53 मि.,) याने पंजाब ऍण्ड सिंध कडुन तर सैफ मोहम्मदने (54 मि.,) क्रीडा प्राधिकरणकडुन प्रत्येकी एक एक गोल केला.
निकाल ः
गट अ ः हॉकी पंजाब ः 5 (सिमरनज्योत सिंग 3, 7 मि., विशालजित सिंग 49 मि., रमण कुमार 53 मि., अंगदबीर सिंग 60 मि.,) वि. वि. एसएससीबी ः 1 (दिपक 12 मि.,) . हाफटाईम ः 2-1
हॉकी युनिट ऑफ तामिळनाडू ः 2 (एस. कार्थी 44 मि., एस. मारीश्वरन 48 मि.,) ड्रॉ विरुद्ध हॉकी हिमाचल ः 2 (चंद्रजिंत सिंग 57 मि., अमित 59 मि.,) हाफ टाईम ः 0-0
गट ब ः हॉकी हरियाणा ः 3 (अंकुश 4, 36 मि., परमित 56 मि.,) वि. वि. हॉकी झारखंड आनुरुद भेंगरा 42 मि., राजू होरो 45 मि.,) हाफ टाईम ः 1-0
मणिपुर हॉकी ः 4 (निरजकुमार वारिबाम 19, 47 मि., रोहित इरेंगबाम 28, 32 मि.,) वि. वि. मुंबई हॉकी असोसिएशन लि. ः 3 (अनिल राठोड 38 मि., मोहित काथोटे 43, 52 मि.,). हाफ टाईम 2-0
गट क ः गंगपूप ओडिशा ः 2 (अमनदिप लाक्रा 36 मि., ग्रेगोरी झेस 51 मि.,) वि. वि हॉकी महाराष्ट्र ः 1 (व्यंकटेश केचे 28 मि.,) हाफ टाईम 0-1
दिल्ली हॉकी ः 2 (भरत 44, 51 मि., प्रशांत 55 मि.,) वि. वि. हॉकी कर्नाटक ः 0. हाफ टाईम 0-0
गट ड ः भारतीय खेळ प्राधिकरण ः 1 (सैफ मोहम्मद खान ः 54 मि.,) ड्रॉ वि. पंजाब ऍण्ड सिंध बॅंक ः 1 (हरकवलबीर सिंग 53 मि.,) हाफटाईम ः 0-0
—–
मंगळवारचे सामने
गट अ ः हॉकी चंडीगड वि. हॉकी हिमाचल – 8.30 वा
गट ब ः मध्यप्रदेश हॉकी अकादमी वि. मुंबई हॉकी असोसिएशन – 10 वा.
गट क ः उत्तरदेश हॉकी वि. हॉकी कर्नाटक – 11.30 वा
गट ड ः हॉकी ओडिशा वि. हॉकी पंजाब ऍण्ड सिंध बॅंक – 2.30 वा
गट ड ः स्टील प्टांट स्पोर्ट बोर्ड वि. हॉकी बिहार – 4 वा