पुणे,दि.२०:- महाराष्ट्र पोलीस क्रिडा स्पर्धा २०२३ दि, ०७ ते दि १३/०१/२०२३ रोजी नुकत्याच पुणे येथे पार पडल्या असुन, पुणे शहर पोलिस दलास नेमबाजीमध्ये विजेतेपद मिळाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुटींग पुरूष, शुटींग महिला आणि शुटींग सर्व्हिस वेपन या तिन्ही प्रकारामध्ये विजेते पदाचे कप प्रधान करण्यात आले. ही स्पर्धा दि. 7 ते 13 जानेवारी 2023 दरम्यान पार पडली. पदक विजेत्या पोलिस अधिकारी व कर्मचार्यांचे पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त डॉ. जालींदर सुपेकर यांनी अभिनंदन केले आहे.
पुणे शहर पोलीस दलाने घवघवीत यश संपादन केले. पदक विजेत्यांची नावे –
१. पोलीस निरीक्षक, अंकुश चिंतामण, पिस्टल कास्य पदक, –
२. सहा. पोलीस निरीक्षक, राकेश कदम, पिस्टल एक सुवर्ण व दोन रौप्य
–
३. सहा. पोलीस फौजदार नितीन शिंदे, रायफल कास्य पदक
पदक
४. पोलीस अंमलदार राजेंद्र पाटील पिस्टल पाच सुवर्ण, एक कास्य, रायफल दोन सुवर्ण, पिस्टल – – – व एमपी ५ बेस्ट शुटर ट्रॉफी –
५. पोलीस अंमलदार अमोल नेवसे रायफल सुवर्ण – –
६. पोलीस अंमलदार महेश जाधव, रायफल एक सुवर्ण, एक रौप्य, एक कास्य –
७. पोलीस अंमलदार अनिल उकरे रायफल एक कास्य – –
८. पोलीस अंमलदार मंगेश खेडकर रायफल एक कास्य पदक
–
९. पोलीस अंमलदार दत्तात्रय खाडे पिस्टल एक सुवर्ण, एक रौप्य –
१०. पोलीस अंमलदार यास्मीन सय्यद पिस्टल
–
एक कास्य
११. पोलीस अंमलदार वैशाली गोडगे पिस्टल तीन रौप्य –
सर्व नेमबाज स्पर्धकांनी आपले कर्तव्य पार पाडून नेमबाजीचा सराव करून हे यश संपादन केले. मा. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, प्रशासन जालींदर सुपेकर,पोलीस उपआयुक्त मुख्यालय. रोहिदास पवार, पोलीस निरीक्षक. अंकुश चिंतामण, राखीव पोलीस निरीक्षक किशोर टेंभुर्णे व राखीव पोलीस उप-निरीक्षक हटकर
यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धेकांनी पदके मिळवली आहेत. अति वरिष्ठ अधिकार्यांनी सर्वच पदक प्राप्त नेमबाज स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.